Morjim News : भूमिगत वीजवाहिनीचे काम झाले, आता रस्ते कधी सुधारणार?

बांधकाम खाते निद्रिस्त : मांद्रे मतदारसंघात चालकांना करावी लागतेय कसरत
Morjim News
Morjim News Dainik Gomantak
Published on
Updated on

Morjim : पावसाळ्यापूर्वी मांद्रे मतदारसंघात रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून भूमिगत वीजवाहिनी घातली खरी; परंतु रस्त्यांवर जे भले मोठे चर होते, ते तसेच असून त्या चरांचे आता पावसाच्या पाण्यामुळे गटार तयार झाले आहे, तर काही ठिकाणी रस्ताच गायब झाला आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी हे रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थ वारंवार करत होते. परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता विभाग झोपी गेल्यामुळे त्यांना या रस्त्याची डागडुजी पावसाळ्यापूर्वी करता आली नाही.

आता ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम, दगड घालण्याचे काम पेडणे रस्ता विभाग करत आहे. मात्र, जोरदार पावसामुळे ही भर वाहून जात असून तेथे पुन्हा खड्डा निर्माण होत आहे. हे खड्डे वाहनचालक, प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत असून या खड्डेमय रस्त्यांवर वाहनचालकांना कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. या रस्त्यांवरून वाहने चालवताना कंबरडे तर मोडतेच, शिवाय दुचाकी या खड्ड्यांमध्ये कधी पडेल, हे सांगता येत नाही. वीज खात्याने निर्माण केलेले हे खड्डे सार्वजनिक बांधकाम खाते बुजवण्यास अपयशी ठरल्यामुळे ही दोन्ही खाती या खड्ड्यांना कारणीभूत आहेत.

Morjim News
Monsoon in Goa - मुसळधार पावसाचा कहर | Gomantak TV

भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामामुळे या पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या दरवर्षीपेक्षा अधिक तीव्र बनली आहे. पावसाळ्यात समस्या उदभवणार, हे माहीत असूनदेखील शासनाकडून योग्य ती काळजी न घेतल्यामुळे सध्या रस्त्यांवर प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. आता पाऊस सुरू झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्पुरत्या उपायांवर लक्ष केंद्रित करून सर्व खड्डे बुजवावेत.

जगन्नाथ पार्सेकर, मांद्रे.

Morjim News
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा-पणजीतील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजचे ताजे दर

भूमिगत वीज केबल घालताना रस्त्यांची योग्य ती काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे सध्या ही स्थिती उदभवली आहे. आता पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाली आहे. मांद्रे मतदारसंघात काही ठिकाणी गटार व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाळ्यात पूर्ण रस्ते पाण्याखाली जातात. सध्या रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे रस्ता कुठे आहे ते कळत नाही.

अमोल राऊत, माजी सरपंच, आगरवाडा.

Morjim News
Goa Railway : वीर-खेड स्थानकांदरम्यान 7 जुलै ला मेगा ब्लॉक

मांद्रे मतदारसंघातील रस्त्यांच्या दुर्दशेला सरकारच जबाबदार आहे. संबंधित आमदार आणि अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने जनतेला त्रास होत आहे. रस्ते सुरक्षित असतील तर वाहतूक सुरळीत होईल. सरकारने जनतेच्या जीवाशी न खेळता दोषी कंत्राटदारांवर कारवाई करावी, त्यांना काळ्या यादीत टाकावे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती का होईना उपाययोजना करावी.

नारायण रेडकर, मांद्रे गट काँग्रेस अध्यक्ष.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com