Bhoma Road: "..अन्‍यथा पंचायतीसमोरच उपोषण करु"! भोम ग्रामसभेत पुन्‍हा ‘बगलमार्ग' गाजला; ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Bhoma Bypass Protest: ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला की, येत्या २० फेब्रुवारीपर्यंत हा प्रश्‍‍न मार्गी लावा, अन्यथा पंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू करू.
Bhoma Bypass Protest
Bhoma Bypass ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: भोम पंचायतीच्या ग्रामसभेत बगलमार्ग चौपदरीकरणाचा विषय पुन्हा गाजला. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला की, येत्या २० फेब्रुवारीपर्यंत हा प्रश्‍‍न मार्गी लावा, अन्यथा पंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू करू.

सरपंच अब्दुल शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. सुरुवातीला पंचायत सचिवाने मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला. त्यानंतर ग्रामस्थांनी भोम येथील नियोजित बगलमार्ग आणि संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा केली.

Bhoma Bypass Protest
Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

ग्रामस्थांनी गावातून जाणाऱ्या चौपदरी मार्गाला तीव्र विरोध दर्शवला आहे. आत्तापर्यंत अनेक आंदोलने झाली, बैठका झाल्या. मात्र अद्याप हा प्रश्‍‍न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांवर या प्रलंबित प्रकल्पाची टांगती तलवार असल्याचे त्यांनी सांगितले व आंदोलनासाठी सज्ज असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

Bhoma Bypass Protest
Bhoma Highway: 'गडकरींचे उत्तर दिशाभूल करणारे'! भोमवासीय बगलमार्गाच्या मागणीवर ठाम; वाद चिघळण्याची शक्यता

कचऱ्याच्‍या राशींमुळे जलस्रोतांवर होतोय विपरीत परिणाम

ग्रामसभेत इतर विषयांवरही चर्चा झाली. नागझर डोंगरमाथ्यावर सिमेंट प्रकल्प सुरू होण्यामुळे गावातील जलस्रोतांचे प्रदूषण होण्याचा धोका, कुंडई भागातील टाकाऊ कचऱ्याचे ढिगारे जलस्रोतांवर विपरीत परिणाम करत आहेत; हा कचरा त्वरित हलवावा अशी मागणी प्राधान्‍याने करण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com