लोकांनीच पक्षबदलूंना धडा शिकवावा! जुने गोवेत पक्षांतर करणाऱ्यांविरोधात निदर्शने

Peoples protesting against defection in Old Goa
Peoples protesting against defection in Old Goa Dainik Gomantak

फोंडा: सत्तेत सहभागी होण्यासाठी जनमताचा अनादर करणाऱ्या लोकप्रतिनिधींविरुद्धचा संताप आज (रविवारी) जुने गोवेतही दिसला. जुने गोवेतील गांधी चौकात (Gandhi chawk Old Goa) झालेल्या या निदर्शनांवेळी स्वतःच्या स्वार्थासाठी मतदारांना गहाण टाकणाऱ्यां आमदारांविरुद्ध आता प्रखर आंदोलन उभारावेच लागेल, असे वक्त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते समील वळवईकर यांनीही टीकेची झोड उठवताना काँग्रेसमधून (Congres) निवडून येऊन भाजपात (BJP) प्रवेश करणे म्हणजे सरळसरळ जनमताला झिडकारण्यासारखे असून लोकांनीच त्यांना धडा शिकवावा असे आवाहन केले.

या निदर्शनात ग्लेन काब्राल, शंकर पोळजी, महेश नायक, आझिम शेख, मारिया लोपिस, किरण नाईक, इफ्तियाझ सय्यद, तनोज अडवलपालकर व इतरांनी आपले विचार व्यक्त करताना आणखी पक्षांतर नकोच, असा धोषा लावला.

Peoples protesting against defection in Old Goa
Panchayat Election: सभापती रमेश तवडकर यांच्या पत्नी सविता तवडकर यांचा उमेदवारी अर्ज

स्वतःच्या स्वार्थासाठी निवडून येऊनही आमदारांनी लोकांना गहाण टाकले आहे. स्वार्थ साधण्यासाठी जनमताचा सर्रासपणे अनादर होत असून या लोकांना आता धडा शिकवण्याची पाळी आली असून गोमंतकीयांनी एकसंध होऊन अशा दलबदलू लोकांना जाब विचारण्यासाठी पुढे येण्याची आवश्‍यकता आहे, असे सभेचे निमंत्रक तथा मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष कुतिन्हो यांनी सांगितले. आपण त्यातले नाही म्हणणारे मडगावचे आमदार दिगंबर कामत हे सत्ताधारी भाजपचे उपकप्तान असल्याचे कुतिन्हो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com