Goa Forward Party : माध्यान्ह आहाराची बिले तातडीने फेडा- गोवा फॉरवर्डची मागणी

विद्यार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवू नका
Goa Women Forward President Adv Ashma Sayed
Goa Women Forward President Adv Ashma SayedDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Forward Party गोव्यातील शाळांना माध्यान्ह भोजन पुरविणाऱ्या स्वयंसेवी बचत गटांची 13 कोटी रुपयांहून अधिकची प्रलंबित बिले फेडण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशाबद्दल गोवा फॉरवर्ड पार्टीने तीव्र निषेध केला आहे.

नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळा पुन्हा सुरू होणार असल्याने ही बिले फेडली नाहीत, तर हजारो विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे जेवण चुकण्याचा धोका आहे. कारण पैसे त्वरित न दिल्यास बचत गटांनी पुरवठा बंद करण्याची धमकी दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या तोंडचे जेवण काढून घ्यायचे नसेल, तर ही बिले सरकारने त्वरित फेडावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उपाध्यक्ष ॲड. अश्मा सय्यद यांनी केली आहे.

गोवा सरकारकडे विविध कार्यक्रमांवर आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी 10 कोटी खर्च करण्यासाठी निधी आहे, पण मुलांच्या आहारासाठी निधी नाही, अशी टीका सय्यद यांनी केली.

Goa Women Forward President Adv Ashma Sayed
G-20: ‘स्टार्टअप’साठी सामूहिक सामर्थ्य दाखवा

विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या बचत गटांना सहा महिन्यांहून अधिक काळ पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे, हे जाणून अतिशय दुःख होत आहे.

सरकारने स्वयंसाहाय्य गटांना प्रलंबित पैसे त्वरित जारी करून विद्यार्थ्यांच्या कल्याण आणि पोषणाच्या गरजांना प्राधान्य दिले पाहिजे.

विलंब आणि बिले न भरणे या वारंवार समस्या बनल्या आहेत, ज्यामुळे या पुरवठादारांना अवाजवी त्रास होतो आणि महत्त्वपूर्ण मध्यान्ह भोजन कार्यक्रमात व्यत्यय येत असतो, असे त्या म्हणाल्या.

Goa Women Forward President Adv Ashma Sayed
गोव्याला देशतील 'फार्मास्युटिकल हब' बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील; मंत्री पियूष गोयल यांची माहिती

केंद्राचा निधी न मिळाल्याचा दावा चिंताजनक

केंद्राचा निधी राज्याला अद्याप मिळालेला नसल्याचा दावा चिंताजनक आहे. मात्र, राज्य सरकार विलंबाचे कारण उघड करत नाही किंवा त्याकडे लक्ष देत नाही.

सरकारने हा निधी लवकरात लवकर माध्यान्ह आहार पुरविणाऱ्या बचत गटांना वितरीत करण्याचे सुनिश्चित करावे, असे गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्ष ॲड. अश्मा सय्यद यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com