Goa HSSC Result 2023 : यंदा बारावीचा निकाल वाढला दोन टक्क्यांनी

पुन्हा मुलींचीच सरशी : इयत्ता दहावीचा निकाल ‘मे’च्या मध्यावर
Goa Board result 2023
Goa Board result 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12 वी परीक्षेचा निकाल 95.46 टक्के लागला असून मागील वर्षापेक्षा तो दोन टक्क्यांनी जास्त आहे. विशेष म्हणजे, यंदाही निकालात मुलींनी बाजी मारल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.

यावेळी मंडळाचे सचिव विद्यादत्त नाईक, उपसंचालक भारत चोपडेकर, साहाय्यक संचालक शीतल कदम उपस्थित होते. पर्वरी येथील उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयातील आयोजित परिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते

Goa Board result 2023
Anjuna Police Drugs Raid: ड्रग्स तस्करी प्रकरणी शापोरा रेस्टॉरंट नंतर 'शिवा व्हॅली'वर पोलिसांचा छापा

शेट्ये म्हणाले की, यंदाचा बारावीचा निकाल 95.46 टक्के लागला आहे. गतवर्षी म्हणजेच २०२२ मध्ये बारावीचा निकाल ९२.६६ टक्के इतका लागला होता. यंदा एकूण १९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी १८ हजार ४९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलींचा टक्का ९५.८८ टक्के असून मुलांचा टक्का ९५.०३ टक्के इतका आहे. ४९ जणांचे निकाल विविध कारणांमुळे राखून ठेवले आहेत. एकूण ९,६६१ मुलांनी परीक्षा दिली. पैकी ९,१८१ मुले उत्तीर्ण झाली. यंदा ९,७१६ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९,३१६ मुली उत्तीर्ण झाल्या.

Goa Board result 2023
IMD Goa: गोव्यात उद्या, परवा गडगटासह पाऊस; गोवा वेधशाळेचा अंदाज

निकालाची प्रत ऑनलाईन मिळणार

8 मे रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून शाळेच्या लॉगीनवरून निकाल डाऊनलोड करता येईल. विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावरून निकालाची प्रत डाऊनलोड करू शकतात. मंडळाच्या www.gbshse.in तसेच http://results.gbahsegoa.net// या वेबसाईटवर हा निकाल पाहता येईल.

इयत्ता दहावीचा निकाल ‘मे’च्या मध्यावर जाहीर होईल, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com