गोवा पोलीसांच्या नाकावर टिच्चुन हॉटेल वेस्टीनमध्ये रंगली पार्टी

गोव्यात(Goa) संचारबंदीच्या( curfew) काळात यंत्रणेच्या नाकावर टिच्चून पुण्यातील(Pune) व्यवसायिकाच्या मुलाचा लग्नसमारंभ(Party) आयोजित करण्यात आला आहे.
Party is being held at Hotel Westin in Goa during the curfew
Party is being held at Hotel Westin in Goa during the curfewDainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली: हणजुण पोलीस(Anjuna Police) स्थानकापासून एक किलोमीटरच्या परिसरात असलेल्या वेस्टीन(Hotel Westin) या तारांकीत हॉटेलात शनिवारी दुपारी एका जंगी लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हाती लागली असून त्यामुळे गेले दोन दिवस सदरच्या हॉटेल आवारात मोठा गाजावाजा रात्री संगीताची धुम चालल्याच्या ग्रांमस्थांच्या तक्रारी आहेत. दरम्यान, गुरुवारी रात्री बार्देशचे मामलतदार लक्ष्मीकांत कुट्टीकर यांनी हणजुण पोलिस पथकासह येथील हॉटेलला भेट देऊन पाहाणी केली यावेळी त्यांच्याकडुन या लग्नसमारंभाची सविस्तर माहिती घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. (Party is being held at Hotel Westin in Goa during the curfew)

पुणे ( महाराष्ट्र ) येथील एका धनाढ्य कुटुंबातील एकुलत्या एका पुत्राचा विवाह त्यांच्या कुटुबीयांकडून हणजुणाती या पंचतारांकित हॉटेलात शनिवारी दुपारी आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळाली असून याबाबतचा जाहिरात फलकही गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठवड्याभरापुर्वीच खुलेआम टांगण्यात आल्याची माहिती तेथील स्थानिक टेक्सी चालकांकडून मिळाली आहे. दरम्यान, राज्यात 28 जुनच्या सकाळी सात वाजेपर्यंत सर्वत्र संचारबंदी लागुं करण्यात आलेली असतांना पुण्यातील त्या कुटुंबाला हणजुणात खुलेआम लग्न समारंभाची पार्टी करण्याची परवानगी सरकारकडून कशी काय देण्यात आली असा संतप्त सवाल याभागातील सामाजिक कार्यकर्ते बलभीम मालवणकर, सुरेंद्र गोवेकर तसेच इतरांनी केला आहे.

Party is being held at Hotel Westin in Goa during the curfew
Goa Curfew Update: डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे संचारबंदी वाढण्याची शक्यता

हॉटेल व्यवस्थापन सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 जुनला आयोजित येथील लग्नसमारंभासाठी वेस्टीन हॉटेलच्या पंचवीसहून अधिक आलीशान खोल्या संबंधित धनाढ्य कुटुंबीयांकडून बुक करण्यात आल्या आहेत त्यामुळे शनिवारी दुपारी संपन्न होणाऱ्या या लग्नसमारंभासाठी गेले तीन ते चार दिवस अनेक कामगार शुक्रवारी संध्याकाळ पर्यत लग्नाच्या जय्यत तयारीत गुंतल्याचे दिसून आले. दरम्यान, यासंबंधात स्थानिक लोकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत हणजुणचे पोलिस निरीक्षक सुरज गांवस यांनी आपल्या पोलिस पथकासह गुरुवारी रात्री याभागाची पाहाणी केली तसेच आयोजित लग्नसमारंभासाठी प्राप्त परवान्यांंची चौकशी करून त्यासंबंधात तयार अहवाल वरिष्ठ अधिकार्यांना सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सावियो आल्मेदा ( सरपंच हणजुण-कायसुव पंचायत ) : पंचक्रोशीतील पंचतारांकित हॉटेलात चालणार्या कुठल्याही बेकायदा क्रुत्यांवर कारवाई करण्यासाठी योग्य सरकारी यंत्रणा कार्यरत आहे त्यामुळे याबाबतीत ढवळाढवळ करण्याची पंचायत मंडळाची बिल्कुल इच्छा नाही या उलट अशाच पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापनाकडून वेळोवेळी मिळणारा कर गांवच्या विकासकामासाठी उपयोगात आणला जातो. सरपंच या नात्याने संबंधित मामलतदार तसेच स्थानिक पोलिसांत यासंबंधात कल्पना देऊ शकतो देट्स ऑल.

राज्यात लागुं करण्यात आलेली संचारबंदी केवळ स्थानिक लोकांसाठीच काय ? कर्फ्युचा मान राखीत स्थानिक लोकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवलेले आहेत मात्र राज्यात घुसखोरी केलेले परप्रांतीय व्यापारी बिनधास्तपणे आपला धंदा व्यवसाय करतांना दिसतात. संबंधित पंचतारांकित हॉटेल अशाच एका परप्रांतीय व्यवसायिकाचे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Party is being held at Hotel Westin in Goa during the curfew
Goa Board: दहावीच्या निकालाची प्रक्रिया सुरू

राज्यात लागुं करण्यात आलेली संचारबंदी केवळ स्थानिक लोकांसाठीच काय ? कर्फ्युचा मान राखीत स्थानिक लोकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवलेले आहेत मात्र राज्यात घुसखोरी केलेले परप्रांतीय व्यापारी बिनधास्तपणे आपला धंदा व्यवसाय करतांना दिसतात. संबंधित पंचतारांकित हॉटेल अशाच एका परप्रांतीय व्यवसायिकाचे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com