Goa Weather Update: गोव्यासाठी धोक्याचा इशारा; ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही मुसळधार पाऊस

Goa Monsoon 2024: गोव्यात संततधार पाऊस पडण्यामागे या भागात निर्माण झालेले पूरक हवामान हे कारण आहे
Dr Ramesh Kumar About Goa Monsoon: गोव्यात संततधार पाऊस पडण्यामागे या भागात निर्माण झालेले पूरक हवामान हे कारण आहे
Dr Ramesh kumarCanva, Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात मागील ५० दिवसांत १०० इंच पाऊस झाला आहे. अजूनही पावसाचे ७० दिवस बाकी आहेत. जुलैमध्येच सर्वाधिक पाऊस पडला, तरी ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत पर्जन्यवृष्टी जोरदार राहणार आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्या अनुषंगाने सज्ज राहिले पाहिजे.

गोव्यासाठी हा संभाव्य धोक्याचा इशारा आहे, असे मत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे निवृत्त शास्रज्ञ डॉ. रमेश कुमार यांनी रविवारी ‘गोमन्तक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

‘गोमन्तक टीव्ही’चे वरिष्ठ प्रतिनिधी नीरज नाईक यांनी घेतलेल्या मुलाखतीत कुमार म्हणाले की, पणजीत एका दिवसात ३६ मिमी पाऊस झाला; परंतु इतर भागांत त्यादिवशीचे पर्जन्यमान पाहिले तर राज्यातील पर्जन्यमान केंद्रांवर १०, १५ ते २० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. त्यावेळी पणजीत अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले.

सध्या सर्व केंद्रांवर दररोज दहा सेंमी पावसाची नोंद होत आहे आणि ही स्थिती नक्कीच सर्वांसाठी वाईट आहे. कारण आपत्ती व्यवस्थापन समितीला एकाच ठिकाणी लक्ष केंद्रीत करता येत नाही. त्यांना सर्वत्र लक्ष द्यावे लागते. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली, दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या दिसतात.

यापुढेही असेच प्रकार घडतील. वाळपई केंद्रावर सर्वाधिक पावसाची यापूर्वीच नोंद झाली आहे. मॉन्सूनला ५० दिवस पूर्ण झाले असून ७० दिवस बाकी आहेत. ‘अल निनो’चा प्रभाव ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही दिसून येईल, असे दिसते.

कुमार म्हणाले की, गोवा वेधशाळा खरोखरच चांगले काम करीत आहे. त्यांनी मागील काही दिवसांत रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीकडे पाहिले तर ७ जुलैला सर्वाधिक पर्जन्यमान नोंदले गेले. १२ ते २१ जुलैच्या सकाळपर्यंतचा काळ पाहिला तर सतत पाऊस पडला आहे. गतवर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सतत पर्जन्यवृष्टी झाली होती.

Dr Ramesh Kumar About Goa Monsoon: गोव्यात संततधार पाऊस पडण्यामागे या भागात निर्माण झालेले पूरक हवामान हे कारण आहे
Goa Rain Update: उंच लाटांचा धोका, 'अंजुणे'मधून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कारवारशी संपर्क तुटला

पुढील काही दिवस कसोटीचे

गोव्यात संततधार पाऊस पडण्यामागे, या भागात निर्माण झालेले पूरक हवामान हे कारण आहे. पुढील काही दिवसांत पाणी साचणे, भूस्खलन, झाडे पडणे, फांद्या मोडणे असे प्रकार निश्‍चित दिसून येतील. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाला नेहमीच सतर्क राहावे लागणार आहे, असेही कुमार यांनी नमूद केले.

Dr Ramesh Kumar About Goa Monsoon: गोव्यात संततधार पाऊस पडण्यामागे या भागात निर्माण झालेले पूरक हवामान हे कारण आहे
Goa Rain Update: चार दिवस ऑरेंज अलर्ट; पावसाची शतकी खेळी

पाऊस सर्व विक्रम मोडणार

यंदा इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात सर्वाधिक ५८ टक्के पाऊस झाला आहे. ‘अल निनो’चा परिणाम ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दिसून येईल. पाऊस सध्या ‘टी-२०’ सामना खेळत आहे. ज्या पद्धतीने या सामन्यात विक्रम मोडले जातात, तसे प्रत्येक दिवसागणिक गोव्याला वेगळा धक्का बसेल, असेही कुमार यांना वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com