Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Film Dear Zindagi road Goa: बार्देशातील निसर्गरम्य ‘पर्रा-माडानी’ परिसर सध्या पर्यटनाच्या नकाशावर झपाट्याने ठसा उमटवत आहे.
Goa Parra Road
Goa Parra RoadDainik Gomantak
Published on
Updated on

योगेश मिराशी

म्हापसा: बार्देशातील निसर्गरम्य ‘पर्रा-माडानी’ परिसर सध्या पर्यटनाच्या नकाशावर झपाट्याने ठसा उमटवत आहे. रस्त्याच्या दुतर्फा डौलाने उभी असलेली नारळाची झाडे, सभोवतालची हिरवीगार शेते आणि शांत वातावरण यामुळे या परिसराला निसर्गाचे अप्रतिम लेणे लाभले आहे. काही वर्षांपूर्वी स्थानिक शेतकरी आणि सायकलस्वारांच्या वर्दळीपुरता मर्यादित असलेला हा रस्ता आता देशभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजू लागला आहे.

पर्रा-माडानी रस्ता प्रकाशझोतात येण्यामागे बॉलिवूडचा मोठा वाटा आहे. ‘डियर जिंदगी’ या चित्रपटातील आलिया भट्ट आणि शाहरुख खान यांच्या सायकलिंगच्या दृश्यामुळे या रस्त्याला देशभरात ‘डियर जिंदगी रोड’ अशी नवी ओळख मिळाली. पडद्यावर दिसलेले निसर्गसौंदर्य आणि सायकलिंगचा अनुभव प्रत्यक्षात घेण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून भेट देत आहेत.

नारळाच्या बागांच्या सावलीत सायकलिंग करणे, वाऱ्याच्या झुळुकीत रील्स बनवणे आणि प्री-वेडिंग फोटोशूट करणे, यासाठी तरुणांची येथे दररोज गर्दी होत आहे. विशेषतः सोशल मीडिया कंटेंट तयार करणाऱ्या तरुणांसाठी हा परिसर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Goa Parra Road
Goa University: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पदव्या आता 'डिजिलॉकर'वर! गोवा विद्यापीठाचा 'नाड' प्रणालीत समावेश; कागदपत्रे बाळगण्याची गरज नाही

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक शहाळे विक्रेते, छोटे कॅफे आणि चहाच्या टपऱ्यांना रोजगाराची नवी संधी मिळाली आहे. फोटोग्राफीची सुविधाही येथे उपलब्ध असून, स्थानिक पंचायतीने पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पूर्वी शांत असलेला हा परिसर आता स्थानिकांच्या उपजीविकेलाही हातभार लावू लागला आहे.

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक शहाळे विक्रेते, छोटे कॅफे आणि चहाच्या टपऱ्यांना रोजगाराची नवी संधी मिळाली आहे. फोटोग्राफीची सुविधाही येथे उपलब्ध असून, स्थानिक पंचायतीने पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पूर्वी शांत असलेला हा परिसर आता स्थानिकांच्या उपजीविकेलाही हातभार लावू लागला आहे.

कुटुंबांसाठीही विशेष आकर्षण

पर्रा-माडानीचे आकर्षण केवळ तरुणांच्या रील्स आणि फोटोशूटपुरते मर्यादित राहिलेले नाही. हा परिसर आता कौटुंबिक पर्यटनाचे केंद्रही बनत आहे. लहान मुलांसाठी येथे प्ले गार्डन उभारण्यात आले असून घसरगुंड्या, झोपाळे आणि अन्य खेळण्यांमुळे चिमुकल्यांना सुरक्षित वातावरणात खेळण्याचा आनंद घेता येतो. याशिवाय फोटोग्राफीसाठी विशेष स्पॉटही तयार करण्यात आले आहेत.

Goa Parra Road
Goa Sport: FC गोवाला 'क' गटात स्थान; AFC चॅलेंज लीग मोहीम 17 ऑक्टोबरपासून कुवेतमध्ये

सायकली भाड्याने उपलब्‍ध

‘डियर जिंदगी’ चित्रपटातील आलिया भट्ट आणि शाहरुख खान यांच्या सायकलिंग दृश्यामुळे प्रसिद्ध झालेल्या पर्रा-माडानी रस्त्यावर आता पर्यटकांना सायकलिंगचा अनुभव घेता येत आहे. माडानी रस्त्यावर पर्यटकांसाठी सायकली भाड्याने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्ध्या तासासाठी साध्या सायकलीचे २०० रुपये, तर जोडप्यांसाठी उपलब्ध असलेल्या डबल सायकलीचे ३०० रुपये भाडे आकारले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com