Goa केरीतील शाळा विलिनीकरणास पालकांचा विरोध

शाळा बंद करू नका, असे निवेदन शिक्षण खाते तसेच मुख्यमंत्र्यांना दिले.
School
School Dainik Gomantak
Published on
Updated on

तालुक्यातील वेलिंग-प्रियोळ पंचायत क्षेत्रातील चार व केरी (keri) पंचायत क्षेत्रातील दोन शाळा बंद करून पाच ते सात किलोमीटर अंतरावरील सातोर्डे-केरी येथील शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्याचा निर्णय सरकारने घेतला असून याला सर्व पालकांनी हरकत घेतली आहे. या शाळा बंद करू नका, अशी मागणी करणारे निवेदन (Statement) शिक्षण खाते तसेच मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष गौतम सांगावकर यांनी दिली.

वेलिंग-प्रियोळ Veling-Priol पंचायत क्षेत्रातील गाळवाडा, आपेव्हाळ, मागीलवाडा व गावठण येथील शाळांचे सरकारने लाखो रुपये खर्च करून हल्लीच नूतनीकरण केले आहे. आता या शाळा बंद करून पाच ते सात किलोमीटर अंतरावर मुलांना शाळेला पाठवण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा आहे. मराठी शाळा संपविण्याचे कटकारस्थान तर सरकार करत नाही ना, असा प्रश्न पालकांना सतावत आहे.

School
Goa Congress MLA| अखेर नजिर खान यांचे ते भाकीत खरे ठरले! काँग्रेसच्या आठ आमदार भाजपच्या वाटेवर

गावात शाळा हवी! पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष सांगावकर म्हणाले, आम्ही ज्या शाळेत शिकलो, त्याच शाळेत आमच्या मुलांना पाठवत आहोत. मध्यवर्ती ठिकाणी ही शाळा असल्याने ती सोयीस्कर आहे. यासंदर्भात आम्ही शिक्षण खाते व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना शाळा बंद करू नये असे निवेदन दिले आहे. शाळा आमच्याच गावात सुरू ठेवा, अशी मागणीही त्यांनी केली.

School
ओजस्वीनीच्या कामगिरीमुळे राज्याच्या शिरपेचात 'मानाचा तुरा'

साताेर्डे-केरीचा रस्ता धोकादायक: वेलिंग-प्रियोळचे माजी सरपंच तथा पालक मंगलदास च्यारी म्हणाले, सातोर्डे-केरी या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवणे धोक्याचे आहे. हा संपूर्ण रस्ता धोक्याचा असून यापूर्वी अनेकदा अपघातही झाले आहेत. असे असताना त्या ठिकाणी मुलांना पाठवणे, हे कितपत योग्य आहे. शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी करावी आणि मगच निर्णय घ्यावा.

School
Goa Congress Rebel : काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; 'हे' आमदार करणार भाजपप्रवेश

आर्ल-केरी येथील प्रेमानंद गुरव म्हणाले, शाळा बंद करायची होती, तर मग सरकारने ग्रामीण भागातील सर्व शाळांचे नूतनीकरण का केले? पहिली ते चौथीपर्यंत मुलांचे शिक्षण मातृभाषेतून व्हायला पाहिजे. शिक्षण खाते खासगी शाळांना अनुदान देते. पटसंख्या कमी आहे, हे कारण देऊन मराठी शाळा बंद करणे, हे धोरण चुकीचे आहे. याचा फेरविचार व्हावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

42 Percent Cooperative Societies Closed
PM Matsya Sampada Yojana Goa
NEP Implementation In Goa
Yuri Alemao Opposition Criticism
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com