Goa Road Accident: रस्ते अपघातांची मालिका सुरूच

दिवसभरात तीन घटना, एकाचा बळी
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

Goa Road Accident

गोव्यात रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून दिवसभरात तीन घटना घडल्या आहेत. यात एकाचा बळी गेलाय तर अन्य काहीजण जखमी झाले आहेत.

कार अपघातात दांपत्य बचावले

सांगे येथे रविवारी दुपारी कार अपघातात एक दांपत्य बचावले. या स्वयंअपघातात कारचे नुकसान झाले. एका कारमधून फोंडा येथील दांपत्य प्रवास करीत होते. त्यांची कार दांडो, सांगे येथे दिवाणी न्यायालयाजवळ आली असता स्लीप झाली. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तिने विजेच्या खांबाला धडक दिली. या स्वयंअपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

कारने ठोकरले; महिला जखमी

पणजी- ताळगाव पठारावरील श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमजवळ कारचालकाने स्कूटरला ठोकर देऊन तो पसार झाला. या अपघातात स्कूटरचालक मनीषा नारायण महाजन या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना गोमेकॉत दाखल केले आहे.

कारचालकाचे नाव नील साळकर असून तो ताळगाव पठार येथील रहिवासी असल्याची माहिती आगशीचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिली.

Goa Accident
Goa Monsoon Update 2023: पावसाचा जोर कायम; लाखाे रुपयांच्या हानीसह जनजीवन विस्कळीत

स्वयंअपघातात सहचालक ठार

पणजी नव्या मांडवी पुलाजवळ पर्वरीच्या बाजूने भर वेगाने जाणारी स्कूटर घसरल्यामुळे दुचाकीवर मागे बसलेला सहचालक ब्रिजमोहन हा ठार झाला.

या अपघातामुळे मांडवी पुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. हा अपघात शनिवारी दुपारी घडला. शवचिकित्सेनंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द केल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली.

Goa Accident
LLB Admission Process मध्ये नक्की चाल्लयं काय? 60 टक्केवाले मेरीट यादीत तर 90 टक्के मिळूनही...

म्हापसा येथे कोलवाळच्या दिशेने चाललेल्या कारला पुलावर असताना अचानक आग लागली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून या घटनेत जवळपास तीन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेत सुमारे तीस हजारांपर्यंतचे नुकसान वाचवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com