Panaji Waterlogging: मुसळधार पावसाचे पाणी साचल्याने दुकानदारांची कोंडी; पणजीतील समस्येवर महापौरांकडून दिलगिरी व्यक्त

Heavy Rain Goa: रविवारी रात्री पणजी शहरातील १८ जून मार्गावर आणि रेगो बार, तसेच मळा परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडल्या.
Heavy Rain Goa
Panaji WaterloggingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: रविवारी रात्री पणजी शहरातील १८ जून मार्गावर आणि रेगो बार, तसेच मळा परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे रस्त्यालगतच्या दुकानदारांना त्याचा त्रास सहन करावा लागला. या पाणी साचण्याच्या घटनेमुळे सोमवारी महापौर रोहित मोन्सेरात यांनी दुकानदारांची माफी मागितली आहे.

महापौर मोन्सेरात यांनी सांगितले की, समुद्राला असलेली भरती आणि मुसळधार पाऊस यांच्या एकत्रित परिणामामुळे पणजी शहरात पाणी साचले. पाटो परिसरातील गटार व इतर कामांच्या खर्चाचा एक प्रस्ताव महानगरपालिकेने वित्त विभागाकडे सादर केला होता; परंतु तो फेटाळण्यात आला. ‘रेगो बार’सारख्या काही भागांमधील रस्ते पूर्णपणे खोदून दुरुस्त करणे आवश्यक आहे आणि हे काम केवळ पावसाळ्यानंतरच करता येईल.

Heavy Rain Goa
Salaulim Dam News: साळावली धरण अखेर 'ओव्‍हरफ्‍लो', यंदा तब्‍बल 35 दिवसांचा विलंब; पर्यटकांसाठी निसर्गाचा आकर्षक नजराणा

ज्या भागांची दुरुस्ती करणे शक्य आहे, त्या कामांना उद्यापासून सुरवात केली जाईल. शहरातील ‘डीबी’ मार्ग, १८ जून मार्ग आणि आत्माराम बोरकर मार्गाचे काम होणे बाकी आहे, ते पावसाळ्यानंतरच केले जाईल. काल पाणी साचल्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथके त्वरित ठिकठिकाणी गेली होती. पाण्याचा निचरा होईल, ती जागा त्वरित त्यांनी मोकळी केली. त्यामुळे काही वेळात साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्याचे रोहित यांनी सांगितले.

शहरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत, त्याचा फटका दुकानदारांना झाला आहे, त्याबाबत आपण दिलगीर आहोत, असे सांगत रोहित यांनी पाणी साचण्याची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, असेही नमूद केले. ताळगाव मतदारसंघातील जनतेबरोबर आई जेनिफर मोन्सेरात यांचे आमदार म्हणून ऋणानुबंध जोडले गेले आहेत.

Heavy Rain Goa
धरणांतील पाणीसाठा 10 दिवसांत 10 ते 12 टक्क्यांनी वाढला; पंचवाडी, गावणेत सर्वाधिक वाढ- जलस्रोत विभागाची आकडेवारी

त्यांचा वारसा आपण पुढे नेण्याची आपली इच्छा आहे; परंतु उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाचा आहे. पक्षाने संधी दिली तर ताळगावातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले. महानगरपालिकेत महापौर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ताळगाव मतदारसंघाशी आपल्या कुटुंबाचे दीर्घकाळापासून राजकीय नाते आहे. त्यामुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची आपली इच्छा आहे.

मात्र, पक्ष हा सर्वांत महत्त्वाचा असून, त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्यास आपण तेथे आव्हान स्वीकारू. दरम्यान, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांताक्रुझ मतदारसंघात कार्यालय सुरू करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापाठोपाठ आता त्यांचे पुत्र आणि महापौर रोहित मोन्सेरात यांनी ताळगावातून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे. त्यांची आई जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनामुळे ताळगावची विधानसभा सदस्याची जागा रिक्त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com