Panaji: स्मार्ट सिटी विकासाला चालना! सांडपाणी, रस्त्यांचे मॅपिंग होणार; ड्रोनद्वारे डेटा संकलित करण्याचे काम सुरू

Panaji Smart City Mapping: मेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने डॉईश गेसलशाफ्ट फर इंटरनॅशनल झुसामनआर्बिट (गीझ इंडिया) बरोबर ‘अर्बन-ॲक्ट’ प्रकल्पावर भागीदारी केली आहे.
 Panaji Smart City Urban Act Project
Panaji Smart City MappingDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji infrastructure mapping

पणजी: इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने डॉईश गेसलशाफ्ट फर इंटरनॅशनल झुसामनआर्बिट (गीझ इंडिया) बरोबर ‘अर्बन-ॲक्ट’ प्रकल्पावर भागीदारी केली आहे. पणजीसाठी हा प्रकल्प हवामान आणि संकलित माहिती (डेटा) आधारित शहरी विकासाला चालना देण्यासाठी तयार केला आहे. या उपक्रमाद्वारे हवामान आव्हानांना सामोरे जाण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मॅपिंग, संसाधन व्यवस्थापन आणि शाश्वत शहर नियोजनावर भर दिला जात आहे.

पणजीचा भूआकार व सांडपाणी पायाभूत सुविधांचा व्यवस्थित अभ्यास करून हवामानानुसार शहरी नियोजनासाठी एक मजबूत डेटाबेस तयार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली स्थित मेसर्स एक्सेल जिओमॅटिक्स आणि मेसर्स टेक्नो इसेन्स सोल्युशन्स यांची नियुक्ती आयपीएससीडीएलने केली आहे. शहराचा भूआकार, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे नेटवर्क, तसेच रस्ते व इतर उपयोगीतांच्या मॅपिंगचे सर्वेक्षण करणे हे त्यांच्या कामात समाविष्ट आहे.

 Panaji Smart City Urban Act Project
Panaji: मनपाला 'हजार कोटी' रुपये द्या! महापौर मोन्सेरात यांचे वित्त आयोगाला साकडे

एकास एक हजार अशा प्रमाणातील टोपोग्राफिकल सर्वेक्षणासाठी डिफरेंशियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (डीजीपीएस) उपकरणाचा वापर करण्यात आला आहे. पणजी शहरात २४ प्राथमिक सर्वेक्षण ठिकाणे (पीएससीपीएस) स्थापन करण्यात आली आहेत. यासाठी भारतीय सर्वेक्षण संस्थेच्या सातत्यपूर्ण माहिती केंद्राचा (कोर्स) वापर करण्यात आला आहे.

 Panaji Smart City Urban Act Project
Panaji: पणजीत पार्किंग समस्या गंभीर; ‘कोंडी’ सुटेना, वाहतूक पोलिसही हतबल

तसेच इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस) वापरून रस्ते, नाले व इतर रेषीय वैशिष्ट्यांचे मोजमाप करण्यात आले आहे. ड्रोनसह हवाई सर्वेक्षण करण्यात आले असून त्यासाठी तीन किलो वजनाचे लिडार उपकरण वापरण्यात आले आहे. याच्या आधारे डिजिटल टेरेन मॉडेल (डीटीएम) व ५ सेमी ग्राउंड सॅम्पलिंग डिस्टन्स (जीएसडी) असलेली ऑर्थो रेक्टिफाइड प्रतिमा (ओआरआय) तयार करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com