Panaji: मनपाला 'हजार कोटी' रुपये द्या! महापौर मोन्सेरात यांचे वित्त आयोगाला साकडे

Rohit Monserrate: आपत्ती व्यवस्थापनासाठी उपाययोजना करण्याकरिता १ हजार कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी सोळाव्या वित्त आयोगाकडे करण्यात आल्याची माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली.
Rohit Monserrate
Rohit MonserrateX
Published on
Updated on

पणजी: निधीचे वाटप कसे करायचे यासाठी स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची परवानगी महानगरपालिकेला द्यावी, त्याव्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापनासाठी उपाययोजना करण्याकरिता १ हजार कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी सोळाव्या वित्त आयोगाकडे करण्यात आल्याची माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली.

सोळाव्या वित्त आयोगाची बैठक दोना पावला येथील तारांकित हॉटेलमध्ये गुरुवारी पार पडली. याप्रसंगी मुख्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री, सचिव त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी महानगरपालिकेला खर्च करण्यासाठी काही बंधने आहेत, ती बंधने हटविणे आवश्यक आहेत. त्यासाठी महानगरपालिकेला निधी खर्चाविषयी स्वायत्तता द्यावी, अशी मागणी महापौर मोन्सेरात यांनी केली आहे.

Rohit Monserrate
Panaji: पणजीत अजून दोन वर्षे पाईपमधून गॅस पुरवठ्यास विलंब! 'खोदकाम' परवानगीमुळे गोंधळ

सोळाव्या वित्त आयोगाने नगरपालिकांच्या काही समस्या आहेत त्या सर्व ऐकून घेतल्याबद्दल महापौर मोन्सेरात यांनी आभार मानत सांगितले की, पर्यावरण बदलामुळे कधीही आपत्तीची स्थिती निर्माण होत आहे, त्यासाठी आयोगाकडे आम्ही एक हजार कोटींचा निधी मागितला आहे. मागील मान्सूनमध्ये अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, त्याशिवाय पाणी साचण्याचे प्रकारही घडले.

Rohit Monserrate
Rohit Monserrate: सलग चौथ्यांदा पणजी महापौरपदी रोहित मोन्सेरात विराजमान

आम्ही आमच्यावतीने आयोगाकडे प्रस्ताव मांडलेला आहे. अगोदरच सरकारने आयोगाकडे ३२ हजार कोटी मागितलेले आहेत, आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा आयोग विचार करेल अशी आशा आहे, असेही रोहित मोन्सेरात यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com