Panaji: पणजीत पार्किंग समस्या गंभीर; ‘कोंडी’ सुटेना, वाहतूक पोलिसही हतबल

Panaji Traffic Issue: पणजी वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार रोज ६,००० ते ८,००० वाहने दिवजा सर्कलमार्गे पर्वरी, मडगाव आणि रायबंदर येथून शहरात येतात.
Parking Problem
Traffic jamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या खोदकामामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पणजी शहरात पार्किंगचा मोठा प्रश्न समोर आला आहे. पार्किंगची कमतरता, वाढती वाहने आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे शहरातील वाहतूक पोलीसही समस्येचा सामना करण्यात हतबल झाले आहेत.

पणजी वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार रोज ६,००० ते ८,००० वाहने दिवजा सर्कलमार्गे पर्वरी, मडगाव आणि रायबंदर येथून शहरात येतात. त्याशिवाय, केटीसी बस स्थानक व मल्टी-लेव्हल कार पार्किंग मार्गे ४,००० ते ६,००० वाहने शहरात प्रवेश करतात. काही वाहने केनी पेट्रोल पंप आणि जुन्या सचिवालयाजवळील रस्त्यावरून येतात. पर्यटकांच्या भाडेतत्त्वावरील कार आणि दुचाकींचाही यात मोठा वाटा आहे. कार्यालयीन वेळेत पार्किंगसाठीची स्पर्धा इतकी तीव्र असते की अनेक वाहनचालक नो-पार्किंग झोनमध्ये गाड्या उभ्या करतात किंवा डबल पार्किंग करून रस्ते अडवतात.

Parking Problem
Goa Traffic Rule: 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' केल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द; वर्षभरात 5,438 चालकांना तालांव

१२,००० वाहनांची गर्दी

दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ दरम्यान शहरात १२,००० वाहनांची गर्दी होते. परंतु, शहरात फक्त ७,००० वाहनांसाठीच पार्किंगची सोय आहे, त्यात चारचाकी वाहनांसाठी फक्त २,००० जागा आणि दुचाकींसाठी ५,००० जागा असल्याची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे. वाहतुकीसाठी अत्यावश्यक ठिकाणी वाहनांच्या वाढत्या संख्येला तोंड देण्यासाठी पणजी शहराला प्रभावी पार्किंग धोरणाची आवश्यकता आहे.

Parking Problem
Panaji Traffic Jam: पणजीच्या वाहतूक कोंडीत अडकले 'मुख्यमंत्री', रुग्णवाहिकाही खोळंबली; गोमंतकीय हैराण

वाहतूक शाखेकडे मनुष्यबळ कमीच

रोज ७५-८० वाहनचालकांना नो-पार्किंग किंवा डबल पार्किंगसाठी दंड आकारला जातो. वाहतूक शाखेकडे १०० कर्मचाऱ्यांची मंजूर संख्या असताना सध्या ७०-८० कर्मचारीच कार्यरत आहेत. वाहतूक पोलीस मुख्यालयातील ''ट्रॅक'' (ट्रॅफिक रिस्पॉन्स अँड कन्झेशन कंट्रोल) उपक्रमांतर्गत वाहतूक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. उपअधीक्षक सुधेश नार्वेणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी डेटा-आधारित उपाययोजना देखील केल्या जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com