Lokotsav 2026: रौप्यमहोत्सवी लोकोत्सवाबाबत मोठी अपडेट! महोत्सवासाठी तिकीट आकारण्याचा विचार; मंत्री तवडकरांचे सूतोवाच

Goa Lokotsav 2026: पणजीत यंदापासून रौप्यमहोत्सवी लोकोत्सव होत आहे. पर्यटकांना आणि स्थानिकांनाही लोकोत्सवाचे आकर्षण असते. लाखो लोक आठ दिवसांत या महोत्सवाला भेट देत असतात.
Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarX
Published on
Updated on

पणजी: पणजीत यंदापासून रौप्यमहोत्सवी लोकोत्सव होत आहे. पर्यटकांना आणि स्थानिकांनाही लोकोत्सवाचे आकर्षण असते. लाखो लोक आठ दिवसांत या महोत्सवाला भेट देत असतात. त्यामुळे या उत्सवासाठी पुढील काळात तिकीट आकारण्याचा सरकार विचार करीत आहे, अशी माहिती कला व संस्कृती खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी दिली.

वनमहोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी उपस्थित राहिलेल्या तवडकर यांनी सांगितले की, आपण या महोत्सवाची संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्यासाठी नवे नाही, आपल्या मतदारसंघात ८९० चौ. मी. खोतिगाव अभयारण्य आहे, त्या भागात राहतात तेथील लोक कसे उदाहरनिर्वाह करतात याची आपणास कल्पना आहे.

जैवविविधता संस्कृती लोकांसमोर आलेली नाही. जैवविविधतेच्या आधारावर आपण जगू शकतो, त्याच धर्तीवर लोकोत्सवाचे आयोजन केले जाते. गोव्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता, संस्कृती आहे. गोव्यात केवळ किनारा संस्कृती नाही, तर ग्रामीण संस्कृती आहे, तिचे संवर्धन करण्याबरोबरच तिचा वापर पर्यटनाच्यादृष्टीने करणे आवश्यक आहे.

शहरातील लोकांना ग्रामीण संस्कृती, खाद्य संस्कृती दाखविताना त्या लोकांना उदरनिर्वाहाची सुविधा निर्माण करण्याचा अशा महोत्सवातून प्रयत्न होत आहे. ते पुढे म्हणाले, जुने ते सोने असे म्हटले जाते. लोकांना आता जाणीव झालेली आहे, पुरातन खाद्यपदार्थ तेलविरहीत होते आणि आरोग्यासाठी ते लाभदायक होते.

Ramesh Tawadkar
Lokotsav: ..कधी जोकर, कधी डाकू, तर कधी राक्षस! 56 सोंगे धारण करून गोवा लोकोत्सव गाजवणारा बहुरुपी

त्यामुळे त्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहत होते. आपण आयोजित करीत असलेल्या महोत्सवातही विविध खाद्यपदार्थ उपलब्ध होत असल्याचाही उल्लेख त्यांनी केले. मागील कला व संस्कृती मंत्र्यांनी लोकोत्सव विविध तालुक्यांत नेण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते, असे विचारल्यानंतर तवडकर म्हणाले, असा काही आमचा प्रयत्न नाही. परंतु राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटक पणजीत येतात आणि त्याच ठिकाणी महोत्सव होणे आवश्यक आहे. अशा महोत्सवासाठी तिकीट आकारणी झाल्यास त्याचा फायदा कलाकारांना व इतरांना होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

Ramesh Tawadkar
Lokotsav 2025: गणेशवंदनेने ‘लोकोत्सव’चे उद्‍घाटन! राजस्थानी 'मांगनियार'ने रसिक मंत्रमुग्ध

‘कायमस्वरुपी २५ स्टॉल्स उभारणार’

पणजीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भगवान महावीर उद्यानात हा महोत्सव आयोजन करण्यामागे लोकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी. गोव्याची दुसरी बाजू आम्ही या महोत्सवाच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

या ठिकाणी आपण प्रवेश केल्यानंतर वनात आल्यासारखा भास वाटतो. या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या दोन महिन्यांत या ठिकाणी २५ स्टॉल्स कायमस्वरुपी उभारले जातील. त्यात शेतकरी, स्वयंसाह्य गट किंवा इतर ग्रामीण व्यवसायिकांना हे स्टॉल्स उपलब्ध असतील, अशी माहिती गोवा वन विकास महामंडळाच्या चेअरमन डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com