Lokotsav: ..कधी जोकर, कधी डाकू, तर कधी राक्षस! 56 सोंगे धारण करून गोवा लोकोत्सव गाजवणारा बहुरुपी

Lokotava Bahurupi: कधी जोकर, कधी डाकू, कधी फकीर, कधी पठाण तर कधी जादूच्या दिव्यातील राक्षस बनवून ते लोकांमध्ये उभे असतात.
Rajasthani Bhand Artist In Goa
Lokotsav Bahurupi ArtistDainik Gomantak
Published on
Updated on

एकेकाळी राज दरबारात स्थान असलेली 'बहुरूपी' ही कला अजूनही अस्तित्वात आहे याची कल्पनाही  त्यांचे सादरीकरण यंदाच्या गोवा लोकोत्सवात पाहीपर्यंत फार जणांना नसेल.‌ राजस्थानातील चित्तोडगढमधील एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचे सदस्य 'बहुरूपी' बनून लोकोत्सवात आपली कला सादर करताना पाहणे अप्रुपाचे होते.

गेल्या तीनशे वर्षांपासून त्यांच्या कुटुंबात चालत आलेली ही कला सादर करताना आजोबा, पिता आणि दोन पुत्र वेगवेगळी रूपे घेऊन लोकांमध्ये फिरत त्यांचे मनोरंजन करत होते. कधी जोकर, कधी डाकू, कधी फकीर, कधी पठाण तर कधी जादूच्या दिव्यातील राक्षस बनवून ते लोकांमध्ये उभे असायचे. आपल्या वेशभूषा धारण करण्याच्या कौशल्याने त्यांनी अनेकांना अचंबीत केले. 

विक्रम भांड आणि त्याचा भाऊ रविकांत भांड हे या 'भांड' किंवा 'स्वाॅंग' कलाकारांच्या कुटुंबातील शेवटच्या पिढीचे सदस्य आहेत.‌ त्यांचे वडील दुर्गाशंकर भांड आणि आजोबा छगनलाल भांड हे चौघेही मिळून या लोकोत्सवात त्यांच्या पिढीजात 'भांड' कलेचे सादरीकरण करत आहेत.

वेगवेगळ्या प्रकारची एकूण 56 रूपे ते धारण करू शकतात. ही रूपे धारण करताना स्वतःचा मेकअप तेच करतात. प्रत्येक रुपासाठी आवश्यक असणाऱ्या वेशभूषेची रचनादेखील ते स्वतःच करतात. त्यांच्या मेकअप कौशल्याबद्दल सांगताना विक्रम म्हणतो, 'मेकअप करणे ही आमची विशेष कौशल्याची बाब असते. त्यात आम्ही इतके प्रवीण आहोत की इतर माध्यमासाठी  होणाऱ्या कोणत्याही मेकअप कौशल्याला आम्ही सहज मागे सरू शकतो.'

शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा दीपावली किंवा होळी यासारखे सण राजा-महाराजांकडून साजरे व्हायचे तेव्हा या ‘भांड’ (बहुरूपी) कलाकारांना तिथे विशेष निमंत्रण असायचे. दरबारी समारंभात वेगवेगळी रूपे धारण करून ते जनतेचे मनोरंजन करायचे. या कामासाठी दरबाराकडून त्यांना भरभक्कम असा दौलतजादाही मिळायचा.

Rajasthani Bhand Artist In Goa
Lokotsav 2024: 'तवडकर आदर्श राजकारणी आहेत', लोकोत्‍सव सोहळ्यात उरांव यांचे गौरवोद्‌गार

मात्र ही कला आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. अवघेच 'भांड' कलाकार आता राजस्थानमध्ये बाकी राहिले आहेत. विक्रम सांगतो, 'या कलेचे कौतुक करणारे व तिला आधार देणारे लोक कमी झाल्यामुळे 'भांड' कुटुंबातील नवीन पिढीला या कलेत स्वारस्य राहिलेले नाही. देशभर होणारे लोकोत्सवांसारखे (सरकारी) कार्यक्रम सोडल्यास आमची अदाकारी दाखवण्यासाठी इतर व्यासपीठ उपलब्ध नसते.‌'

विक्रम आणि त्याचा भाऊ हे ‘भांड’ कलाकार कुटुंबीयातील शेवटच्या पिढीचे सदस्य आहेत.‌ विक्रम सध्या आपल्या पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षाला आहे. सुशिक्षित असूनदेखील तो अजूनही आपल्या वडिलांबरोबर आणि आजोबांबरोबर आपल्या या पिढीजाद कलेचे सादरीकरण करत असतो. त्याबद्दल त्याचे त्याच्या गावात कौतुकही होत असते.‌

Rajasthani Bhand Artist In Goa
Kala Academy: नाट्यगृह की कचरा अड्डा? कला अकादमी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

गोव्यात विक्रमच्या आजोबांनी काही वर्षांपूर्वी आपल्या कलेचा परिचय लोकोत्सवात करून दिला होता. विक्रम मात्र गोव्यात पहिल्यांदाच आपल्या कलेचे सादरीकरण करतो आहे. तिच्या आजोबांनी (छगनलाल भांड) या कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करून या कलेची ओळख जगाला करून दिली आहे.‌ विक्रम देखील आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची इच्छा बाळगतो.‌ 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com