Budget: वेळेत निधी मिळत नाही!

बहुतांश मंत्र्यांची खंत : सरकारचे बाणावलीत ‘चिंतन’
Budget
BudgetDainik Gomantak
Published on
Updated on

Budget अर्थसंकल्‍पातील तरतुदींनुसार निधी वेळेत उपलब्‍ध होत नसल्‍याची खंत बाणावली येथे आयोजित चिंतन शिबिरात बहुतांश मंत्र्यांनी मुख्‍यमंत्र्यांसमोर व्‍यक्‍त केली.

विविध खात्‍यांचे सचिव, संचालक व तज्‍ज्ञांच्‍या उपस्‍थितीत महसूल तूट कमी करणे आणि कर वाढविण्‍याच्‍या पर्यायांवर यावेळी सखोल ऊहापोह करण्‍यात आला.

राज्‍यातील प्रशासन हे सुशासित आणि सुनियोजितपणे चालावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून पुढे आलेले चिंतन शिबिर हे सध्‍या दक्षिण गोव्‍यातील बाणावली येथील ताज हॉटेलमध्‍ये सुरू असून, शुक्रवारी सकाळी मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी उद्‍घाटन केले.

शिबिरात उद्या (ता. 10) उद्योग, शेती, महसूल ग्रामीण विकास, माहिती तंत्रज्ञानावर विशेष चर्चा होणार आहे. यात संबंधित मंत्री आणि सचिव वरील विषयांची सविस्तर मांडणी करतील.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सरकारने केलेल्या 9 वर्षांतील कामगिरी जनतेपर्यंत पोचावी आणि राज्य सरकारांचा कारभार अधिक सुरळीत व्हावा यासाठी देशातील भाजपशासित प्रदेशांमध्ये अशा मंत्री आणि सचिव स्तरावरच्या बैठका आयोजित केल्या आहेत.

या बैठकांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित योजनांचा लाभार्थींना होणारा लाभ जनतेपर्यंत पोचवावा अशा सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्या आहेत. यासाठी आवश्यक असलेला मंत्री आणि सचिवांमधला समन्वय वाढावा हा मागील उद्देश आहे.

आज दिवसभरात आरोग्य, घरपट्टी, बांधकाम परवाने महसूल वाढ, पर्यटन विकास या विषयांवर संबंधित मंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली.

त्रुटींचा मागोवा घेणार

सरकारच्‍या योजनांमध्‍ये काही त्रुटी असल्‍यास किंवा त्‍या राबविण्‍यात काही अडचणी येत असल्‍यास प्रत्‍येक मंत्री या शिबिरात आपले म्‍हणणे मांडणार असून, त्‍यानंतर चर्चा करून त्‍यासंबंधी काही तोडगा काढता येणे शक्‍य आहे का, यावरही या शिबिरात चर्चा केली जाणार आहे.

Budget
Weather Update: उष्‍मा वाढला, प्रतीक्षा माॅन्सूनची; शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

महसूल वाढीसाठी सकारात्‍मक चर्चा

वीजमंत्री सुदिन ढवळीकर पहिल्‍या दिवशी उपस्‍थित नव्‍हते. ते गोव्‍याबाहेर असून, शनिवारी उपस्‍थित राहणार आहेत. महसूल वृद्धी‍साठी सकारात्‍मक चर्चा झाली; स्रोत वाढत नसल्‍याने चिंता; संचालक म्‍हणतात, प्रयत्‍नांची पराकाष्ठा करतो. जीएसटी संदर्भात तेलंगणा येथील तज्‍ज्ञांनी, तर गुजरात येथील अर्थतज्‍ज्ञांनी करवसुली गळती रोखण्‍याचे उपाय सुचविले.

वित्तीय खाईतून वर काढा!

1. आणखी २५ वर्षांनंतर म्हणजे २०४७ पर्यंत गोवा आर्थिकदृष्‍ट्या आत्‍मनिर्भर होण्‍याचे लक्ष्‍य बाळगण्‍यात आले आहे.

2. राज्‍यावरील कर्ज कमी करण्याचे आव्‍हान असून, त्‍यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्‍यात आली.

3. बारा तास चाललेल्या चिंतनात गोव्याला वित्तीय खाईतून वर काढावे या एकाच मुद्याभोवती अधिक चर्चा झाली.

Budget
Monsoon Update: नैऋत्य मोसमी पाऊस आज कर्नाटकात

‘मंत्री - सचिवांमध्ये समन्वय वाढवा’

सरकारातील मंत्री तसेच विविध खात्‍यांचे सचिव, अधिकारी यांच्‍यात समन्‍वय असावा आणि त्‍यानुसार राज्‍याची धोरणे आणि योजना पुढे राबवाव्‍यात या उद्देशाने हे शिबिर आयोजित केल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्‍या मंत्रिमंडळाला दिली.

मुख्‍यमंत्री सावंत यांच्‍याबरोबर या शिबिरात विविध खात्यांच्या मंत्र्यांसह पोलिस महासंचालक जसपाल सिंग तसेच अन्‍य खात्‍यांचे सचिव उपस्‍थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com