Bhatlem: भाटलेतील खोदकामामुळे नागरिक त्रस्त! विद्यार्थ्यांची ससेहोलपट; पणजी, ताळगावात येताना होतेय कसरत

Panaji Smart City Work: रस्ता बंद झाल्यानंतर लोकांना वाहने वळवून पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. आणखी दोन दिवस वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा स्वीकारावा लागणार आहे.
Smart City Road Work
Bhatlem Road ClosureDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Smart city project road closure in Bhatlem

पणजी: भाटलेतील स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत भूमिगत मलनिस्सारण वाहिनी जोडण्याचे काम गतीने सुरू आहे. त्यासाठी शुक्रवारपासून रामाचे मंदिर ते सीताबाई कॉम्प्लेक्स असा सुमारे शंभर मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. शनिवार व रविवारपर्यंत तो रस्ता बंद राहणार असल्याने उद्याही विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत चाललेल्या या कामाविषयी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) भाटलेतील रस्त्यावर मॅनहोल आणि चेंबरची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. रामाच्या मंदिराजवळ चेंबरची निर्मिती होत असल्याने त्यांनी तीन ठिकाणी रस्त्याला छेद दिले गेले आहेत.

Smart City Road Work
BhatlemRoad Closure: भाटलेतील प्रमुख रस्‍ता राहणार 3 दिवस बंद; ‘स्मार्ट सिटीच्या' कामांचा दणका, पर्यायी मार्ग जाणून घ्या

त्यासाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे धनलक्ष्मी सोसायटी, सटीमंदीर या भागात राहणाऱ्या लोकांना पणजीत येण्यासाठी मारुती गडावरून मुख्यमंत्री निवासमार्गे यावे लागत आहे. त्याशिवाय त्यांना ताळगावात जाण्यासाठी मारुतीगडमार्गे मडकईकर नगरकडे जाणारा मार्ग स्वीकारावा लागतो.

Smart City Road Work
Bhatlem: मोठ्ठा आवाज आला आणि..; भाटले येथे कशी फुटली गॅस पाईपलाइन, पहा Video

आयपीएससीडीएलने तीन दिवस रस्ता बंद राहणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले होते. सकाळी रस्ता खोदकाम सुरू असतानाही दुचाकीधारकांची ये-जा करण्याची कसरत सुरू होती. दुपारी सर्व रस्ता बंद झाल्यानंतर लोकांना वाहने वळवून पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. आणखी दोन दिवस वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा स्वीकारावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim elevated road traffic
Santinez Footpath Damage Panaji
Panaji Traffic Diversion
Panaji Smart City Rs 146 crore
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com