पणजी जिमखान्याची क्रिकेट करंडक स्पर्धेला सुरुवात

गोव्यात गतवर्षीप्रमाणेच यंदाही स्पर्धा T-20 प्रकारात खेळली जाणार.
Cricket
CricketDainik Gomantak

पणजी: गोव्यातील जुनी क्रिकेट (Cricket) स्पर्धा असलेली पणजी (Panaji) जिमखान्याची बांदोडकर करंडक बाद फेरी क्रिकेट स्पर्धा गुरुवारपासून कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर खेळली जाणार. या स्पर्धेत राज्यभरातील 24 संघांचा समावेश आहे.

गतवर्षीप्रमाणेच यंदाही स्पर्धा T-20 प्रकारात खेळली जाईल. स्पर्धेत बांदोडा, पॅरामाऊंट, शटलर्स, पेडणे, महालक्ष्मी क्लब, डिचोली, अल-फताह, सुपर, युनियन स्पोर्टस वाळपई, यंग स्टार्स, गोवा स्पोर्टस अकादमी, पणजी जिमखाना (Panaji Gymkhana) A , गतवेळचे उपविजेते मराठा वॉरियर्स, लिओ, स्टॅमिना, गोमेकॉ कँपस, अमरावती क्लब, इक्बाल इलेव्हन, पणजी जिमखाना ब, कांदोळी असोसिएशन, पोळे, रुद्रेश्वर युवक संघ, एस. के. जॉगिंग, सनी क्लब या संघांचा समावेश आहे.

Cricket
गोव्याचा जेसेल झाला केरळा ब्लास्टर्सचा कर्णधार..

स्पर्धेतील विजेत्या संघास 50,000 रुपये व करंडक, उपविजेत्या संघास 25,000 रुपये व करंडक, याशिवाय स्पर्धेचा मानकरी, अंतिम सामन्याचा मानकरी, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज (Batsman and Bowler) या वैयक्तिक पुरस्कार विजेत्यास प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस दिले जाईल.

स्थानिक क्रिकेटपटूंना प्राधान्य:

स्पर्धेत सहभागी संघातून गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) प्रीमियर लीग स्पर्धेतील खेळाडूंना भाग घेता येणार नाही. स्पर्धेत गोव्यात जन्मलेल्या खेळाडूंना खेळता येईल. गोव्यात शैक्षणिक अथवा नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या इतर राज्यातील खेळाडूंना दोन वर्षांच्या वास्तवाचा दाखला सादर करावा लागेल. यावर्षी GCA च्या रणजी करंडक, 25 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील संघ शिबिरासाठी निवड झालेल्या खेळाडूंनाही स्पर्धेत भाग घेता येणार नाही, असे आयोजक पणजी जिमखान्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com