गोव्याचा जेसेल झाला केरळा ब्लास्टर्सचा कर्णधार..

सोशल मीडियाद्वारे क्लबने कर्णधाराच्या नियुक्तीची माहिती दिली.
Goa Sports : Jaisal of Goa became captain of Kerala Blasters
Goa Sports : Jaisal of Goa became captain of Kerala BlastersDainik Gomantak

पणजी: Goa Sports - गोमंतकीय बचावपटू जेसेल कार्नेरो याची केरळा ब्लास्टर्सने आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी कर्णधारपदी निवड केली आहे. सोशल मीडियाद्वारे क्लबने कर्णधाराच्या नियुक्तीची माहिती दिली.

Goa Sports : Jaisal of Goa became captain of Kerala Blasters
मुलामुळे राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक!

लेफ्ट-बॅक जागी खेळणारा जेसेल गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सचा उपकर्णधार होता. त्या मोसमातील नऊ सामन्यात त्याने कर्णधारपदाची जबाबदारी पेलली होती. यंदा मोसमाच्या सुरवातीस 31 वर्षीय बचावपटूची पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केरळा ब्लास्टर्ससाठी 2020-21 आयएसएल मोसम खराब ठरला. 20 सामन्यांतून त्यांना 17 गुणांचीच कमाई करता आली, त्यापैकी फक्त तीन सामन्यांत त्यांना विजयाचे पूर्ण तीन गुण मिळाले. नऊ सामन्यांत पराभव पत्करले, तर आठ सामने बरोबरीत राखले. आयएसएलच्या मागील चार मोसमात केरळा ब्लास्टर्सला प्ले-ऑफ फेरी गाठण्यास अपयश आले आहे. मात्र नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली 2020-21 मोसमात उपांत्य फेरी गाठण्याचे लक्ष केरळा ब्लास्टर्स संघ बाळगून आहे. सर्बियाचे इव्हान व्हुकोमानोविच केरळा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक आहेत.

Goa Sports : Jaisal of Goa became captain of Kerala Blasters
IND vs NZ : इतके स्वस्त आहेत भारत-न्यूझीलंड सामन्याचे तिकीट दर

पहिली लढत एटीके मोहन बागानशी

जेसेलच्या नेतृत्वाखालील केरळा ब्लास्टर्सची यंदाची पहिली आयएसएल लढत येत्या 19 नोव्हेंबरला एटीके मोहन बागानविरुद्ध फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल. स्पर्धेलाही याच सामन्याने सुरवात होईल.

जेसेलची कारकीर्द

- आयएसएल स्पर्धेत 2020-21 पासून केरळा ब्लास्टर्स संघात

- 2020-21 मोसमात एकूण 16 सामने, 9 सामन्यांत कर्णधार

- एकूण 34 आयएसएल सामन्यात प्रतिनिधित्व

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com