Goa Politics: 'वेन्झी, 3 दिवसांत माफी मागा'! आमदार साळकरांची मागणी; हलक्यात न घेण्याचा दिला इशारा

Goa BJP: भाजप कार्यालयात घुसखोरी केल्या प्रकरणी आमदार वेन्झी व्हिएगस यांनी तीन दिवसांत जाहीर माफी मागावी, अशी मागणी आमदार दाजी साळकर यांनी भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
Daji Salkar
Daji Salkar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजप कार्यालयात घुसखोरी केल्या प्रकरणी आमदार वेन्झी व्हिएगस यांनी तीन दिवसांत जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते आणि आमदार दाजी साळकर यांनी भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. भाजप मोठा परिवार आहे. कोणी आम्हाला हलक्यात घेऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष तुषार केळकर म्हणाले, वेन्झी यांनी धुमाकूळ घातला. त्यांनी माफी न मागितल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू. याला वेन्झी धमकी म्हणत असतील, तर तसे त्यांनी समजावे.

साळकर म्हणाले, ‘आप’चे नेते श्रीकृष्ण परब म्हणतात की कोणत्याही पक्षाच्या कार्यालयात घुसखोरी केलेली नाही. ‘आप’ला व्हिएगस यांच्यापासून अंतर ठेवायचे आहे, असे यातून दिसते. शांततेत आम्ही काम करतो याचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये. सहनशीलतेचा अंत पाहू नये. आम्ही कोणाच्या कार्यालयात घुसणार नाही.

रामा काणकोणकर मारहाण प्रकरणी केलेला निषेध चुकीच्या पद्धतीने केला गेला. रस्ते अडवले गेले आणि सर्वसामान्यांना त्रास देण्यात आला. याचा आम्ही निषेध करतो. त्यांना आम्ही इशारा देतो, की त्यांनी यापुढे जनतेला असे वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये.

काणकोणकर प्रकरणातील सूत्रधारालाही धरले आहे. मुख्यमंत्र्यांनी कृतीतून अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असे दाखवून दिले आहे, असेही साळकर म्हणाले.

दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर म्हणाले, कायदा हाती घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. भाजपने आदिवासी समाजाला सदोदीत न्याय दिला आहे. गोवा अल्पसंख्याक वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस सिल्वेरा हेही यावेळी उपस्थित होते.

Daji Salkar
Goa Politics: खरी कुजबुज; दोतोर, भांगर सवाय कर

ही’ घुसखोरी सवंग लोकप्रियतेसाठी!

रामा काणकोणकर मारहाण प्रकरणाचा निषेध करताना आमदार वेन्झी व्हिएगस यांनी भाजप कार्यालयात घुसखोरी केली. भाजप कार्यालयात महिला कर्मचारी व महिला कार्यकर्त्या होत्या. जमावापैकी कोणी त्यांच्याशी वावगे वागला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार होता. भाजप काय काणकोणकर प्रकरणी तपास करत होता. नाही ना, मग भाजपवर मोर्चा का आणला. वेन्झी पोलिस अधीक्षक वा महासंचालकांकडून माहिती घेऊ शकले असते. त्यांनी भाजप कार्यालयात घुसण्याचा प्रकार सवंग लोकप्रियतेसाठी केला, असे दाजी साळकर म्हणाले.

Daji Salkar
Goa Politics: खरी कुजबुज, तवडकर- गावडे वाद कशासाठी?

‘अल्टिमेटम’ देणारा भाजयुमो कोण? ः पालेकर

भाजपच्या कार्यालय असलेल्या इमारतीत घुसल्याबद्दल ‘आप’चे आमदार आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांना तीन दिवसांचा ‘अल्टिमेटम’ देणारा ‘भाजयुमो’ कोण, अशा शब्दांत ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. अमित पालेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘आप’कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस (संघटन) श्रीकृष्ण परब, पूजन मालवणकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com