

पणजी: पणजीसह राज्यभरात श्रीरामनवमी उत्सव उत्साहात साजरा झाला. पणजीतील भाटले येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबत पणजीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीमहालक्ष्मी संस्थानात देखील रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
रामजन्मोत्सव कार्यक्रमांनिमित्त पणजीतील अनेक मंदिरांमध्ये विशेष पूजा पार पडल्या. मंदिर परिसर विद्युत रोषणाईसह फुलांनी सजविला गेला होता. ''श्रीराम जय राम जय जय राम, राम जन्मला गं सखे…'' असा जयघोष मंदिर परिसरात ऐकू येत होता. सर्वत्र उत्साहाचे आणि मांगल्याचे वातावरण होते.
श्रीराम मंदिर, भाटले येथे रामजन्मोत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता पूजा, अभिषेक आणि इतर धार्मिक विधी पार पडले. तद्नंतर सकाळी १० वा. श्री विष्णू गवस (इब्रामपूर, पेडणे-गोवा) यांचे रामजन्मानिमित्त कीर्तन संपन्न झाले. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म सोहळा पार पडला. दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. दिवसभर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
श्रीमहालक्ष्मी संस्थानात रामजन्मोत्सवानिमित्त श्रीमहालक्ष्मी, गणपती आणि इतर पंचायतन देवतांची विशेष पूजा करण्यात आली होती. फुलांची विशेष आरास मन प्रसन्न करणारी होती. श्रीरामांच्या लहान परंतु आकर्षक मूर्तीचे पूजन करण्यात आले. पाळणा सोहळा संपन्न झाला. दुपारी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले.
श्रीराम मंदिर, भाटले येथे शुक्रवार दि. २७ रोजी १०.३० वाजता श्रीसत्यनारायण महापूजा, आरत्या व तीर्थप्रसाद आयोजित केले जातील. संध्याकाळी ७ वाजता ''चाफो… मायेच्या पोरसातलो'' हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सर्व भाविकांनी या सोहळ्यास अगत्याने उपस्थित राहून श्रींच्या तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.