Goa Congress: गोवा काँग्रेसमध्ये धुसफूस; भाजप माजी मंत्र्याच्या वाढदिवसाला हजेरी लावणाऱ्या आमदाराची प्रदेशाध्यक्षांनी केली ठाकरेंकडे तक्रार

Goa Politics Latest News: कार्लुस यांचे पक्षाच्या विरोधात अशा पद्धतीने वारंवार कृत्य सुरु आहे. यामुळे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल खचत आहे, असे पाटकरांनी पत्रात म्हटले आहे.
Goa Politics| Congress Latest News
Carlos Alvares Ferreira And Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार कार्लुस फेरेरा यांची पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. फेरेरा वारंवार पक्षविरोधात काम करत असल्याचा आरोप करणारे पत्र पाटकरांनी ठाकरेंना लिहले आहे. या पत्रातून पाटकरांनी फेरेरा यांच्याविरोधात रोष व्यक्त केला आहे.

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी याबाबत प्रभारी माणिकराव ठाकरे आणि सचिव अंजली निंबाळकर यांना पत्र लिहले आहे. कार्लुस फेरेरा यांच्यावर पक्षाविरोधात काम केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी पाटकरांनी पत्राद्वारे केली आहे.

Goa Politics| Congress Latest News
Valpoi: म्हादईच्या पुरामुळे सोनाळ-तार येथील रस्ता जलमय, गावकऱ्यांचे होतायत हाल; रस्त्याची उंची वाढवण्याची मागणी

कुडचडे मतदारसंघात काँग्रेसने १० जुलै रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला कार्लुस गैरहजर होते. पण, त्यांनी त्याचदिवशी भाजप आमदार आणि माजी मंत्री नीलेश काब्राल यांच्या वाढदिवसाला मात्र हजेरी लावली, अशी खदखद पाटकरांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

कार्लुस यांचे पक्षाच्या विरोधात अशा पद्धतीने वारंवार कृत्य सुरु आहे. यामुळे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल खचत आहे, असे पाटकरांनी पत्रात म्हटले आहे. पाटकरांचे पत्र मिळाल्याची माहिती माणिकराव ठाकरे आणि अंजली निंबाळकर यांनी दिली आहे. कोणत्याही कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली आहे.

तर, सचिव अंजली निंबाळकर यांनी याबाबत शिस्तपालन समिती सर्व प्रकरणाचा कसून तपास करेल आणि त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती दिलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com