"दक्षिण गोव्‍यात येण्‍याची चूक करू नका..." टॅक्‍सीवाल्‍यांनी केली दमदाटी, अहमदाबाद येथील महिलेनं व्‍हिडिओद्वारे व्‍हायरल केली व्यथा Watch Video

Goa taxi driver threatens tourist: अहमदाबाद येथील एका पर्यटक महिलेला दोन दिवसांपूर्वी एका भयंकर घटनेला सामोरे जावे लागले.
Tourists are being harassed by taxi operators in Goa
Tourists are being harassed by taxi operators in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: स्‍थानिक टॅक्‍सीचालकांची दमदाटी आणि त्‍यामुळे पर्यटकांना होणारा मनस्‍ताप, या रोजच्‍याच घटना झालेल्‍या असताना दक्षिण गोव्‍यातील एका हॉटेलमध्ये उतरलेल्‍या अहमदाबाद येथील एका पर्यटक महिलेला दोन दिवसांपूर्वी अशाच एका भयंकर घटनेला सामोरे जावे लागले.

स्‍थानिक टॅक्‍सी बुक केली नाही, या एकाच कारणावरून ती थांबलेल्‍या हॉटेलजवळील टॅक्‍सीचालकांनी ‘ॲप’वरून बुक केलेली टॅक्‍सी हॉटेलपर्यंत येण्‍यास मज्‍जाव केला. त्‍यामुळे पाऊस पडत असतानाही फ्‍लाईट चुकू नये, यासाठी भर पावसात त्‍या महिलेला साहित्य घेऊन सुमारे चार किलोमीटर पायपीट करावी लागली.

या पर्यटक महिलेने एका व्‍हिडिओद्वारे आपल्‍यावर ओढवलेला प्रसंग व्‍यक्त केला असून काहीही करा; पण दक्षिण गोव्‍यात येण्‍याची चूक करू नका, असे आवाहन तिने अन्‍य पर्यटकांना केले आहे. माझ्यावर हा प्रसंग ओढवला असतानाही ज्‍या हॉटेलमध्‍ये मी उतरले होते, त्‍या हॉटेलचालकानेही मला मदत केली नाही. आणि पोलिसांना बोलावले तर पोलिसही त्‍या ठिकाणी आले नाहीत, असे तिने या व्‍हिडिओत म्‍हटले आहे.

Tourists are being harassed by taxi operators in Goa
Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

११ ते १५ सप्‍टेंबर यादरम्‍यान ही महिला दक्षिण गोव्‍यातील एका हॉटेलमध्‍ये उतरली होती. १५ सप्‍टेंबरला तिला परत जायचे होते. विमानतळावर सोडण्‍यासाठी स्‍थानिक टॅक्‍सीचालकांनी तिच्‍याकडून ३,५०० रुपये मागितल्‍याने तिने ‘ॲप’वरून टॅक्‍सी बुक केली. मात्र, ही टॅक्‍सी आम्‍ही हॉटेलपर्यंत येऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन स्‍थानिक टॅक्‍सीचालकांनी हुल्‍लडबाजी केली.

त्यावेळी मी पोलिसांना फोन करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यावेळी टॅक्‍सीचालकांनी मला धमक्‍या देण्‍यास सुरुवात केली. पोलिस आल्‍याशिवाय आम्‍ही तुम्‍हाला जाऊ देणार नाही, अशी अडवणूक करण्‍याचा प्रयत्‍न टॅक्‍सीचालकांनी केला. त्‍यावेळी पाऊस पडत होता. काहीही करून मला वेळेत विमानतळावर जायचे होते. त्‍यामुळे नाईलाजाने भर पावसात मला चालत पुढे जाऊन ‘ॲप’वर बुक केलेली टॅक्‍सी पकडावी लागली, असे त्‍या महिलेने व्‍हिडिओत म्‍हटले आहे.

हॉटेलचालकाकडूनही मदतीबाबत भ्रमनिरास

मी ज्‍या हॉटेलमध्‍ये थांबले होते, तिथे दर दिवसाला सहा हजार रुपये भाडे देत हाेते. वास्‍तविक मला जेव्‍हा त्‍या टॅक्‍सीचालकांनी घेरले, त्‍यावेळी हाॅटेलचालक मदतीला धावून येतील, अशी अपेक्षा होती. किमान टॅक्‍सी जिथे आहे, तिथपर्यंत मला साहित्यासह नेऊन साेडतील, असे मला वाटत होते.

Tourists are being harassed by taxi operators in Goa
Goa: 'घर खरेदी गोमंतकीयांच्या आवाक्याबाहेर, दर 666% वाढले', राहुल देशपांडेंचे प्रतिपादन; ‘स्वयंपोषक विकास व गोवा’ सादरीकरण

पण या हॉटेलकडून मला कुठलेही साहाय्‍य मिळाले नाही. उलट ते टॅक्‍सीचालकांना शांत करण्‍याचा प्रयत्‍न करत होते. मी गोव्‍यात पर्यटनासाठी आले होते. पण जाताना आलेला हा अनुभव अतिशय भयानक होता, असे या महिलेने व्‍हिडिओत म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com