बोरकरांचे आमरण उपोषण; पाळे-शिरदोन येथील 'भूरूपांतरण रद्द'साठीचे आंदोलन चिघळले

Palem-Siridao Villagers Stage Protest Against Section 39A Land Change : सांत आंद्रे मतदारसंघातील पाळे-शिरदोन येथील एका मोठ्या भूखंडाचे कलम ‘३९-ए’नुसार रूपांतर केले आहे.
Palem-Siridao Villagers Stage Protest Against Section 39A Land Change
Palem-Siridao Villagers Stage Protest Against Section 39A Land ChangeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सांत आंद्रे मतदारसंघातील पाळे-शिरदोन येथील एका मोठ्या भूखंडाचे कलम ‘३९-ए’नुसार रूपांतर केले आहे, ते रूपांतर रद्द करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी कालपासून (शुक्रवार) सुरू केलेले आंदोलन चिघळले असून त्याने आता आमरण उपोषणासारखे उग्र रूप धारण केले आहे.

‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ पक्षाचे सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी, ‘जोपर्यंत या भूखंडाचे रूपांतरण रद्द होत नाही, तोपर्यंत आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्यासोबत पाळे येथील श्याम गावस आणि तुषार गावस हेही उपोषणास बसले आहेत.

भूरूपांतरण रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी रात्रभर पाटो येथील नगरनियोजन कार्यालयाच्या (टीसीपी) आत आणि बाहेरही पाळे-शिरदोनच्या ग्रामस्थांनी आमदार बोरकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. रात्रीच्या आंदोलनानंतर आज (शनिवारी) सकाळी आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे केलेली मागणी मान्य करण्याचा तगादा लावला. कार्यालयात आंदोलन सुरू झाल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना उचलून बाहेर आणले.

राजकीय पक्षांमध्ये काही मतभेद असले तरी या आंदोलनासाठी आम्ही सर्व एकत्रित आलो आहोत. उद्या (रविवारी) सर्वांनी एकत्रित यावे, असे बोरकर यांनी जे आवाहन केले आहे, त्यात लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. जर या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

टीसीपी कार्यालयात बोरकर यांच्यासोबत काय घडले त्याचा शोध घेतला जाईल; परंतु लोकांनी सरकारी कार्यालयांमध्ये शिष्टाचार राखला पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांचा आदर केला पाहिजे, त्यांना ओलिस ठेवू नये. मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांनी उपाय शोधले पाहिजेत. विधानसभेत त्यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, जे उपाय शोधण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे.

- विश्वजीत राणे, नगरनियोजन मंत्री.

आज शक्तिप्रदर्शनाचा दावा : विरोधी पक्षनेते आणि राजकीय कार्यकर्ते टीसीपी कार्यालयासमोर येऊ लागल्याने पोलिसांच्या वतीने आंदोलनकर्त्यांना आझाद मैदानावर आंदोलनास बसण्याची सूचना केली. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आझाद मैदानावर ठिय्या मांडला. त्यानंतर राजकीय नेते, तसेच ग्रामस्थांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा जाहीर केला. उद्या (रविवारी) सकाळी १० वाजता राज्यातील जनतेने या आंदोलनात सहभागी होऊन ताकद दाखवावी, असे आवाहन आमदार बोरकर यांनी केले.

विरोधी पक्षनेत्यांचा भक्कम पाठिंबा आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, समील वळवईकर, अर्चित नाईक, सुनील कवठणकर, आमदार व्हेन्झी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, वाल्मिकी नाईक, संदेश तेलेकर, क्लॉड अल्वारिस, ॲड. नॉर्मा अल्वारिस, ॲड. अमित पालेकर, अजय खोलकर, गोविंद शिरोडकर, तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे पदाधिकारी आणि सत्तरी तालुक्यातील ग्रामस्थांनी येऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला.

Palem-Siridao Villagers Stage Protest Against Section 39A Land Change
Goa Drowning Death: मौजमजा बेतली जीवावर! पोळे बीचवर कर्नाटकातील 19 वर्षांचा तरुण बुडाला, शोध सुरू

बोरकरांच्या डोक्याला दुखापत : तीव्र संताप

सकाळी सव्वाअकराच्या सुमारास पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली. यावेळी पोलिसांनी आमदार बोरकर यांना उचलल्यानंतर पायऱ्यावरून खाली घेऊन येताना त्यांचे डोके पायरीवर आपटले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांचा पारा चढला. बोरकरांना काही वेळ भोवळ आली. त्यामुळे उपस्थितांनी त्यांना पाणी देऊन विश्रांती घेण्यास सांगितले. अखेर पोलिसांनी कार्यालयातून सर्व आंदोलनकर्त्यांना बाहेर काढून कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले.

तासाचा ‘अल्टीमेटम!’

टीसीपी कार्यालयातील आंदोलकांना निदर्शन स्थळावरून हटविणाऱ्या पोलिसांना आणि सांत आंद्रेचे आमदार बोरकर यांना मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी एका तासाचा अल्टीमेटम सरकारला दिला होता. त्यावर तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता.

Palem-Siridao Villagers Stage Protest Against Section 39A Land Change
Goa Crime: कुंपणच शेत खातं तेंव्हा..! अपघात झाला, चालक झाला गंभीर जखमी; संधी साधून कॉन्स्टेबलने पळवले 8 लाखांचे दागिने

कडक पोलिस बंदोबस्त

पणजीचे पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदानावर रात्री कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com