Pahalgam Attack: 'पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी सापडले नाहीत, हे गृहखात्याचे अपयश'; निवृत्त कर्नल चौधरींची सरकारवर टीका

Colonel Rohit Chaudhary Congress: हल्ला होऊन महिना लोटला तरीही दहशतवादी सापडत नाहीत, हे अपयश आहे, अशी टीका माजी सेवानिवृत्त विभागाचे प्रमुख कर्नल (नि.) रोहित चौधरी यांनी केली.
Colonel Rohit Chaudhary Goa Congress
Colonel Rohit ChaudharyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात निष्पापांचे बळी गेले. अडीच-तीन हजार पर्यटक ज्या ठिकाणी जमतात, त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांची सुरक्षितता नसणे ही गंभीर बाब आहे.

हल्ला होऊन आता महिना लोटला तरीही दहशतवादी सरकारला सापडत नाहीत, हे केंद्रातील गृह खात्याचे अपयश आहे, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या माजी सेवानिवृत्त विभागाचे प्रमुख कर्नल (नि.) रोहित चौधरी यांनी केली.

Colonel Rohit Chaudhary Goa Congress
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना 'अल्टीमेटम', भारत न सोडल्यास 3 लाख रुपये दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा

घटकराज्य दिनानिमित्त काँग्रेसने शुक्रवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कर्नल चौधरी हे ‘जय हिंद सभा’ या विषयावर बोलत होते. व्यासपीठावर गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नांडिस, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार कार्लोस फेरेरा, माजी खासदार श्रीनिवास खलप, फ्रान्सिस सार्दिन, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावियो उपस्थित होते.

Colonel Rohit Chaudhary Goa Congress
Operation Sindoor: जर ऑपरेशन सिंदूर आणखी एक आठवडा चालू राहिलं असतं तर... बलुच नेत्याचं PM मोदींना खुलं पत्र

‘ते चार दहशतवादी आहेत कुठे?’

कर्नल चौधरी म्हणाले, पहलगाम येथील हल्ला पाहिला, तर ४० मिनिटे दहशतवादी त्या ठिकाणी होते. पठाणकोट - पुलवामा येथील हल्ले पाहिल्यास दहशतवाद्यांनी हल्ला करून तेथून तत्काळ पळ काढला, परंतु पहलगाम येथे ४० मिनिटे दहशतवादी होते, अजूनही ते चार दहशतवादी कुठे आहेत हे माहीत नाही, हे गृह खात्याचे अपयश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com