Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना 'अल्टीमेटम', भारत न सोडल्यास 3 लाख रुपये दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा

Pahalgam Terror Attack Ultimatum: भारत सरकारनं जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror AttackDainik Gomantak
Published on
Updated on

भारत सरकारनं जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या हल्ल्यानंतर कडक सुरक्षा उपाय म्हणून, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द करण्यात आले असून, सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात प्रवास करण्याची परवानगीही थांबवण्यात आली आहे.

या निर्णयानुसार, एसव्हीईएस व्हिसाखाली भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २७ एप्रिल ही तारीख सार्क व्हिसा धारकांसाठी अंतिम होती, तर वैद्यकीय व्हिसा असलेल्या नागरिकांसाठी २९ एप्रिलची अंतिम तारीख होती.

चार दिवसांत ५३७ पाकिस्तानी नागरिक वाघा अटारी सीमेवरून त्यांच्या देशात परतले आहेत. परंतु अजूनही अनेक पाकिस्तानी नागरिक भारतात थांबले आहेत. या नागरिकांसाठी भारत सरकारने कठोर उपाययोजना केल्या आहेत. जर या नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडलं नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Pahalgam Terror Attack
Goa Government Jobs: पुढील 2 वर्षांत 10 हजार सरकारी नोकऱ्या! मुख्‍यमंत्र्यांचा पुनरुच्‍चार; दहावी, बारावी अनुत्तीर्णांनाही मिळणार लाभ

कायदेशीर कारवाई अंतर्गत, आरोपींवर खटला दाखल करून तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ३ लाख रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. याशिवाय, व्हिसाची मुदत संपूनही भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

यामुळे, अनेक पाकिस्तानी नागरिकांना भविष्यात भारतातील कायद्याच्या कठोर अंमलबजावणीला सामोरे जावे लागू शकते.त्यानुसार, भारत सरकारच्या आदेशानुसार पाकिस्तानातील नागरिकांना दिलेल्या वेळेत भारत सोडणं अनिवार्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com