Goa Ganpati Festival 2023: ढवळी गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा चतुर्थी बाजार!

ढवळीकरांच्या हस्ते उद्‍घाटन : उत्सव काळात विविध कार्यक्रम
Goa Ganpati Festival 2023
Goa Ganpati Festival 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Ganpati Festival 2023:

ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दीपावली बाजार यशस्वी झाल्यानंतर यंदा ढवळीत चतुर्थी बाजार भरवण्यात येणार आहे. तसेच या गणेशोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल नायर, उपाध्यक्ष कपिल ढवळीकर, वेदांगी ढवळीकर, वरुण तेंडुलकर, नवीन शशीधरन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Goa Ganpati Festival 2023
Goa Molestation Case: प्राध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

चतुर्थीचा बाजार ढवळी येथील मंडळाच्या शामियान्यात १४ सप्टेंबरला भरणार आहे. या चतुर्थी बाजारचे उद्घघाटन सकाळी १० वाजता वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते होणार आहे.

मंडळातर्फे मंगळवारी १९ रोजी गणेशमूर्तीचे पूजन तसेच इतर धार्मिक विधी होतील. बुधवारी २० रोजी पूजा, आरती प्रसाद होणार आहे. गुरुवारी २१ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता श्‍लोक पाठांतर स्पर्धा सहा ते दहा वयोगटासाठी होणार आहे. संध्याकाळी सात वाजता अकरा वर्षांवरील स्पर्धकांसाठी काराओके स्पर्धा होणार आहे. त्यात स्पर्धकांना मराठी व हिंदी गाणी सादर करता येतील. २२ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता मेहंदी व पाककला स्पर्धा होणार आहे.

Goa Ganpati Festival 2023
Goa Sex Scandal: सेक्स स्कँडलप्रकरणी भाजपचा सावध पवित्रा

त्यानंतर साडेपाच वाजता गडेश्‍वर महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी ७ वाजता ‘ओ मोगा‘ हे नाटक सादर करण्यात येईल. शनिवारी २३ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता शांतादुर्गा बाल भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम होईल. रविवारी २४ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसिद्ध गायक कलाकार प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांचा मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होईल.

सोमवारी २५ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता भरतनाट्यमचा कार्यक्रम होईल. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता बक्षीस वितरण व ढवळी गावातील दहावी व बारावीतील पहिल्या दोन गुणवंतांचा गौरव सोहळा होईल. त्यानंतर संध्याकाळी आरती झाल्यानंतर दिंडीद्वारे विसर्जन मिरवणूक निघेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com