G-Tech Exhibition: ट्र्युव्हीव आणि कॉम्पयुटर डिलर फेडरेशन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने 6 व 7 ऑक्टोबर रोजी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात जी-टेक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दि. ६ रोजी सायं. ३ वा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी आयटी मंत्री रोहन खंवटे तसेच आयटी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित राहणार आहेत.
हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन सायमन फर्नांडिस यांनी केले. ते पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आयटी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये, ट्र्युव्हिव कंपनीचे आशिष सोमानी, व्यंकटेश बलावी, हितेश शहा व इतर उपस्थित होते. डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम सोपे होत आहे. अशा प्रकारच्या प्रदर्शनांद्वारे नागरिक, विद्यार्थी, उद्योजकांना नव-नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळेल.
नवीन उपकरणे प्रत्यक्ष पाहता येतील. त्याचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार असल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आयटी सुविधा उभारणार !
प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढले आहे. तंत्रज्ञान ही काळाची गरज ठरत आहे. राज्यात तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने अनेक संधी आहेत. मात्र, त्यासाठी राज्यात आयटी साधन-सुविधा(इन्फास्ट्रक्चर) निर्माण करणे गरजेचे असून त्या उभारण्याच्या अनुषंगाने सरकार सकारात्मक असल्याचे डॉ.चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले.
काय पहाल ?
45 राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय कंपन्याची दालने.
कार्यशाळा, चर्चासत्रांचे आयोजन.
विद्यार्थी, उद्योजक, नागरिकांसाठी उपयुक्त.
नव तंत्रज्ञान, उपकरणे प्रत्यक्ष पहाल.
प्रश्नमंजुषा व स्पर्धांचे आयोजन.
प्रदर्शनात प्रवेश मोफत.
सर्वांसाठी उपयुक्त उत्पादनांचे प्रदर्शन !
गोवा राज्य दरडोई उत्पादनात वाढ होत आहे. त्यासोबत येथील सरकार आरोग्य आणि शिक्षण यावर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. त्यामुळे राज्यात गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ निर्माण होत आहे. त्यासोबत गोवा आदरातिथ्य क्षेत्राचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने येथे अनेक गरजा तसेच संधी उपलब्ध होत असून या प्रदर्शनांत सर्वांसाठी आवश्यक उत्पादनांचे प्रदर्शन असणार असल्याचे ट्र्युव्हीव कंपनीचे संचालक आशिष सोमानी यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.