Job Scam प्रकरणाचा तपास का मंदावलाय? बहुतांश संशयित जामिनावर बाहेर, विरोधकांची प्रश्नांची सरबत्ती

Goa Job Fraud: सरकारी नोकरी लावून देण्‍याची अभिवचने देणाऱ्या दलालांनी कित्‍येकांना फसविले; परंतु आता या प्रकरणांचा तपास मंदावला आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Cash For Job, Goa Government Job Scam, Goa Job Fraud
Cash For Job ScamCanva
Published on
Updated on

Goa Cash For Job Scam

पणजी: सरकारी नोकरी लावून देण्‍याची अभिवचने देणाऱ्या दलालांनी कित्‍येकांना फसविले; परंतु आता या प्रकरणांचा तपास मंदावला आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

संशयितांना पोलिस कोठडी घेताना किंवा जामिनाला विरोध करताना पोलिसांनी गंभीरपणे घेतले नाही. स्वतंत्र यंत्रणेमार्फत किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी करूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.

संशयितांना पाठीशी घालणाऱ्या मुख्य सूत्रधार असलेल्या राजकारण्यांकडे सुई जात असली या घोटाळ्याशी राजकारण्यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देत पोलिसांनी सखोल तपासाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते.

Cash For Job, Goa Government Job Scam, Goa Job Fraud
Goa Crime: वागातोर समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिस तपास सुरु

पूजा नाईक विरोधात २१ ऑक्‍टोबरला पहिला गुन्‍हा दाखल झाला आणि त्‍यानंतर प्रत्‍येक दिवशी नवनवी नावे पुढे येत गेली. सुमारे ३५ लोकांना अटक झाली. पैकी पाचहून अधिक सरकारी कर्मचारी होते. गणेश गावकर यांच्‍या आवाजातील कथित ऑडिओ टेपही व्‍हायरल झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात राजकीय हस्‍तक्षेप वा राजकीय नेत्‍यांचे नाव नसल्‍याचे जाहीर केले; परंतु या प्रकरणांची व्‍याप्‍ती पाहता संबंधित लोक कुणाला पैसे देत होते, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. फसवणुकीसंदर्भातील इतर गुन्‍ह्यांत जेवढी तत्‍परता दिसते, तितकी नोकरी फसवणूक प्रकरणांत दिसली नाही, असा विरोधकांचा दावा आहे. उत्तर गोवा पोलिस अटक झालेल्‍या संशयितांची नावे जाहीर करण्‍यासही नकार देत आहेत. अधीक्षक अक्षत कौशल माहिती देण्‍यापेक्षा लपविण्‍यावर भर देतात, असाही माध्‍यमांना अनुभव आहे.

Cash For Job, Goa Government Job Scam, Goa Job Fraud
Tiger Attack: ..अचानक समोर आला वाघ! हल्ला करणार इतक्यात; चोर्ला घाटातील थरारक प्रसंग वाचा

काही प्रश्‍‍न आणि सद्यस्‍थिती

१. कितीजणांना अटक झाली, याची सविस्तर माहिती देण्‍यास उत्तर गोवा पोलिस अधीक्षक का टाळाटाळ करत आहेत?

२. ज्‍यांना अटक केली, त्‍यापैकी केवळ उमा पाटील अटकेत आहे, उर्वरित जामिनावर सुटले.

३. या सर्व संशयितांविरोधात दाखल तक्रारींनुसार ७ कोटी ५० लाखांहून अधिक रक्‍कम लुबाडली.

४. २८ ऑक्‍टोबरनंतर नोकरीच्‍या नावे आमिषाच्‍या तक्रारी थांबल्‍या.

‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यात जे कोण गुंतलेत, त्यांना वाचविण्यासाठीच पोलिस यंत्रणेचा वापर केला जात आहे. त्यासाठी पोलिसांनी फक्त तपासच शिथिल केला, असे नसून ते आता नव्या तक्रारीही नोंदवून घेत नाहीत, अशी माहिती आम्हाला मिळत आहे. याप्रकरणी काहीजणांनी माहिती हक्क अधिकाराखाली जी माहिती मागितली, तीही त्यांना मिळालेली नाही. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळावे, यासाठी पोलिस नवनवी दुसरी प्रकरणे पुढे आणत आहेत.

विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड.

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणावरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी वेगवेगळी प्रकरणे उकरून काढली जात आहेत. या प्रकरणातील तपास पूर्णत: थंडावला आहे. संशयितांचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला का पाठविले नाहीत? पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलवर जाण्याचे टाळले असले तरी लोकांमध्ये प्रमुख संशयितांच्या नावांची चर्चा आहे.

गिरीश चोडणकर, माजी प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

आम्ही यापूर्वी या प्रकरणातील ध्वनिफित समोर आणली होती. आता काही दिवसांत या प्रकरणातील इतर काही प्रकार समोर आणले जातील. आम्ही या प्रकरणांची उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी केली आहे. सरकारने कितीही प्रयत्न केला तरी या प्रकरणावर आम्ही पडदा पडू देणार नाही.

ॲड. अमित पालेकर, गोवा संयोजक, आप.

कॅश फॉर जॉब प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणांच्या चौकशीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जोपर्यंत हे प्रकरण स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपविले जात नाही, तोपर्यंत मुख्य सूत्रधाराला पकडणे कठीण आहे. या प्रकरणात सरकारमधील काही नेत्यांचा संबंध असल्याचा संशय येतो.

वीरेश बोरकर, आमदार, रिव्हॉल्युशनरी गोवन्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com