Goa House Theft Case
Bicholim TheftDainik Gomantak

Goa Crime: 40 किलोंच्या 'ढोल'ची चोरी! खिडकी तोडून तांब्याची भांडीही पळवली; भंगार गोळा करणाऱ्या महिलांवर संशय

Goa House Theft Case: भायलीपेठ येथील एक बंद घर फोडून एक लाखाहून अधिक किमतीची तांब्याची भांडी पळवली. चोरट्यांनी घरातील ४० किलो वजनाचा ढोलही लंपास केला.
Published on

Burglary in Bicholim

डिचोली: भायलीपेठ येथील एक बंद घर फोडून एक लाखाहून अधिक किमतीची तांब्याची भांडी पळवली. चोरट्यांनी घरातील ४० किलो वजनाचा ढोलही लंपास केला. घरफोडीची ही घटना सोमवारी (24 फेब्रुवारी) दुपारी घडली.

भायलीपेठ येथील नारायण आनंद चणेकर यांच्या घरात ही चोरी झाली आहे. चणेकर यांच्या बंद घराची खिडकी मोडून चोरट्यांनी आत शिरून घरात ठेवलेला ढोल, हंडा आदी तांब्याची भांडी चोरून पळ काढला. याप्रकरणी चणेकर यांनी डिचोली (Bicholim) पोलिसात तक्रार करताच पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

Goa House Theft Case
Bicholim Theft: डिचोलीतील आजाद जामा मशिदीत चोरी, दानपेटी फोडली, चोरटा सीसीटीव्हीत कैद

शहरात चोरट्यांची टोळी

गेल्या महिनाभरात डिचोली परिसरात चोरीच्या चार घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यात बंदरवाडा येथे एकाचवेळी दोन घरांनी चोरी झाली होती. तसेच पंधरा दिवसांपूर्वी शहरातील मशिदीतील दानपेटी फोडण्यात आली.

गेल्या वर्षी तर चोरांनी डिचोलीत दहशत घालताना मंदिरांना लक्ष्य केले होते. गेल्या वर्षी तीन महिन्याच्या आत शहरातील जवळपास सहा मंदिरे फोडण्यात आली होती. आता पुन्हा चोरांच्या कारवाया सुरू झाल्याने डिचोलीत चोरट्यांची टोळी सक्रिय असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्यावेळी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Goa House Theft Case
Bicholim Theft: ..पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ! मंदिरांनंतर आता दुकाने लक्ष्य; जुन्या बाजारात मारला पन्नास हजारांचा डल्ला

महिलांवर संशय

भंगार गोळा करणाऱ्या महिलांनी (Womens) ही चोरी केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चोरीची घटना घडली, त्यावेळी परिसरात भंगार गोळा करणाऱ्या चार-पाच महिला फिरत होत्या. या महिलांना काहीजणांनी हटकलेही होते, अशी माहिती प्रदीप चणेकर यांनी दिली. दुपारच्यावेळी संधी साधून याच महिलांनी ही चोरी केली असावी, अशी शक्यताही वर्तविण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com