
पणजी: गेल्या पाच वर्षांत राज्यात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या ९०३ घटना घडल्या असून, त्यातून गोमंतकीयांना ७३ लाख रुपये गमवावे लागले आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.
गोव्यासह देशभरात ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार वाढल्यानंतर ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे.
या फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सर्वच राज्यांसाठी काही वर्षांपूर्वी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
अशी प्रकरणे घडू नयेत, यासाठी केंद्र सरकारने विविध माध्यमांतून देशभरात जागृती करीत असल्याचेही मंत्री चौधरी यांनी लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.