World Fisheries Day 2022: किनारपट्टी ऱ्हास थांबवण्यासाठी 'नॅशनल फोरम'ने केले 'हे' आवाहन

...तर किनारपट्टीच्या लोकांना आपत्तींना सामोरे जावे लागेल
World Fisheries Day
World Fisheries DayDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त, नॅशनल फिशवर्कर्स फोरमचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम आझाद मैदान मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमास गोवा काँग्रेस नेते ओलेन्सिओ सिमाॅईश यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

(On the occasion of World Fisheries Day National Fishworkers Forum event was held in Mumbai)

World Fisheries Day
Indian Panorama In Iffi: इंडियन पॅनोरमाचा पडदा उघडला; 45 चित्रपटांची मेजवानी सिनेरसिकांसाठी खुली

या कार्यक्रमात बोलताना ओलेन्सिओ सिमाॅईश म्हणाले की, मुंबईतील वाधवण बंदर दरवर्षी 300 दशलक्ष मीटर टन मालवाहतूक करण्यासाठी 30 धक्क्यांसह बांधला जाणार आहे. यासाठी मुख्यतः कोळशाचा समावेश करण्यात येणार आहे. याचा वातावरणावर परिणाम होणार असल्याने नॅशनल फिशवर्कर्स फोरमने केंद्र सरकारला किनारपट्टीचा ऱ्हास थांबवण्याचे आवाहन केले आहे. अशा धोरणांचा सर्वच किनारपट्टीवर परिणाम होऊ शकतो असे ही ते म्हणाले.

World Fisheries Day
New Mandovi Bridge will be closed: नवा मांडवी पूल एक आठवडा राहणार बंद

ओलेन्सिओ पुढे म्हणाले की, केरळमध्ये, केर स्वतंत्र मत्स्य थोझिलाली फेडरेशनने विझिंजम प्रकल्प पूर्णपणे मागे घेण्याच्या एकाच मागणीसह 14 जिल्ह्यांमध्ये विरोध केला. यात पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल. तसेच अशा प्रकल्पांचा परिणाम किनारपट्टी नजिकच्या लोकांवर होईल व त्यांना आपत्ती आणि हवामान बदलांना सामोरे जावे लागेल असे सिमाॅईश म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com