Goa Drugs Cartel : गोव्यात ड्रग्स तस्करीत रशियन ऑलिंपिक पदक विजेती

३० लाखांचे अमली पदार्थ जप्त : मांद्रेमध्ये पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या
Russian Olympic medalist Arrested in drug smuggling
Russian Olympic medalist Arrested in drug smugglingDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drugs Cartel : राज्यात येणारे बहुतांश पर्यटक ‘जीवाचा गोवा’ करण्यासाठी येत असतात. मग या पर्यटकांना ‘सर्व काही’ पुरवणाऱ्यांमध्ये जितका सहभाग परप्रांतीयांचा असतो, तितकाच सहभाग आंतरराष्ट्रीय लोकांचा, तसेच पर्यटकांचाही असतो. विशेष म्हणजे, रशियन ऑलिंपिक पदक विजेती जलतरणपटू स्वेतलाना व्हर्गानोव्हा हिचा ड्रग्सतस्करीत सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे.

स्वेतलाना व्हर्गानोव्हा हिचा या ड्रग्स प्रकरणात सहभाग असल्याचे उघडकीस आल्यानंतर तिच्या दोघा सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नॅशनल नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने मांद्रे येथे टाकलेल्या छाप्यात 30 लाखांचे ड्रग्स जप्त केले असून या प्रकरणात एकूण तिघांना अटक केली आहे.

यामध्ये स्वेतलानासह रशियातील निवृत्त पोलिस आंद्रे आणि गोव्यातील आकाश नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे. यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Russian Olympic medalist Arrested in drug smuggling
Goa Cabinet Reshuffle : मंत्रिमंडळ बदलात 'या' मंत्र्याचा पत्ता कट होणार?

कोण ही स्वेतलाना व्हर्गानोवा?

1980 मध्ये मॉस्को ऑलिंपिकमध्ये, तसेच 1982 मध्ये इक्वेडोर येथे जागतिक जलतरण स्पर्धेत रशियाचे प्रतिनिधित्व केलेल्या स्वेतलाना हिने ऑलिंपिकमधील 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्यपदक जिंकले.

जागतिक स्पर्धेत तिने 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण, तर मेडली रिलेत ब्राँझपदक मिळविले. रशियातील प्रमुख महिला जलतरणपटूंत तिची गणना होत असे. निवृत्त झाल्यानंतर स्वेतलाना हिने लेनिनग्राड (आताचे सेंट पीटर्सबर्ग) येथे जलतरण प्रशिक्षकाचे काम सुरू केले. मात्र, एप्रिल 2023 मध्ये गोव्यात तिला ड्रग्सतस्करीत अटक झाली.

Russian Olympic medalist Arrested in drug smuggling
Goa Police : साध्या वेशात पोलिसांचा ‘ॲटॅक’; उत्तर गोव्यामध्ये 28 दलालांच्या मुसक्या आवळल्या

मोडस् ऑपरेंडी अशी

आंद्रे याने गोव्यातील विविध भागांमध्ये फिरून स्वत:चे नेटवर्क तयार केले होते. पेडलर त्याच्या संपर्कात असायचे. स्वेतलाना आणि आकाश हे आंद्रेसाठी काम करायचे. स्वेतलाना ही परदेशी पर्यटकांच्या संपर्कात असायची. परदेशी पर्यटकांना ती ड्रग्स विकायची, तर आकाश हा स्थानिकांच्या संपर्कात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com