पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बदलावेळी मत्स्योद्योग मंत्री व थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांच्यावर गदा येऊ शकते. कर्नाटक निवडणुकीच्या आधी गोव्यामध्ये मंत्रिमंडळात बदल होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पक्ष बदलूंपैकी आलेक्स सिक्वेरा यांचाच समावेश मंत्रिमंडळात केला जाईल.
मंत्रिमंडळात सध्या अत्यंत कमकुवत सदस्य म्हणून नीळकंठ हळर्णकर यांचेच नाव घेतले जाते. त्यामुळे त्यांना काढून त्याजागी आलेक्स सिक्वेरा यांची वर्णी लावावी, असा निर्णय पक्षाने घेतला आहे.
सध्या मंत्रिमंडळात ‘लाईटवेट’ मंत्री म्हणून नीळकंठ हळर्णकर यांचेच नाव घेता येईल. मंत्री म्हणून त्यांचा काहीच प्रभाव नाही. वर्तमानपत्रातही त्यांचे फोटो छापून येत नाहीत. त्यामुळे त्यांना काढून टाकणे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सोपे जाईल, अशी माहिती भाजपच्या ज्येष्ठ सूत्रांनी ‘गोमन्तक''ला दिली.
म्हणून नीळकंठना ‘नारळ’
थिवी मतदारसंघात हळर्णकर यांचा तसा फारसा प्रभाव नाही, या निष्कर्षाप्रत भाजप संघटन आले आहे. मंत्रिमंडळात बदल करताना लोकसभा निवडणुकीवर परिणाम होऊ नये, असाही विचार केला जातो.
उत्तर गोव्यात सध्या भाजप अत्यंत बळकट आहे. तेथे कोणी उमेदवार दिला तरी भाजपच्या यशात फरक पडणार नाही. त्यामुळे हळर्णकर यांनाच नारळ देणे सोपे जाईल, असे भाजपला वाटते.
फळदेसाईंवरील ‘संकट’ टळले
हळर्णकर किंवा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई हे दोघे मंत्री यापूर्वी ‘हटाव’च्या रडारवर होते. परंतु दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुभाष फळदेसाई यांचे महत्त्व अबाधित आहे. फळदेसाई यांची मंत्री म्हणून कामगिरीही उत्तम असल्याचा अहवाल आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.