Goa Police : साध्या वेशात पोलिसांचा ‘ॲटॅक’; उत्तर गोव्यामध्ये 28 दलालांच्या मुसक्या आवळल्या

पर्यटन मंत्र्यांकडून स्वागत; पोलिस आणि पर्यटन खात्याची पहिलीच संयुक्त कारवाई
Goa police arrest 28 touts
Goa police arrest 28 touts Dainik Gomantak

राज्याच्या किनारी भागात बेकायदेशीरपणे व्यवसाय करून पर्यटकांची लूट आणि छळ करणाऱ्या 28 दलालांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलिसांसह पर्यटन खातेही सक्रिय झाल्याचे आज प्रथमच पाहायला मिळाले.

गोवा पोलिस आणि पर्यटन विभागाने संयुक्तरित्या केलेल्या या कारवाईत 60 पोलिसांनी सहभाग घेतला होता. ही कारवाई करताना साध्या गणवेशात पोलिस नेमले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यात केलेली ही पहिलीच कारवाई असून यामुळे अन्य भागांत सक्रिय असलेले दलाल पसार झाले आहेत.

या विषयावर पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना ऊत आला आहे, हे खरे असून निकोप पर्यटनवाढीसाठी बाधक ठरणाऱ्या या प्रकारांना अजिबात थारा देणार नाही. अशा बाबींविरोधात कडक कारवाई केली जाईल.

गेल्या अनेक दिवसांपासून खात्याकडे अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी येत होत्या. याबाबत पोलिसांशीही चर्चा झाली होती. आता ती चर्चा फलश्रुत झाली असून यापुढेही बेकायदेशीर बाबी खपवून घेणार नाही.

Goa police arrest 28 touts
Pipeline Burst: सांतिनेज जंक्शन परिसरात जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया

पोलिस आणि पर्यटन खात्याची पहिलीच संयुक्त कारवाई

कळंगुट पोलिस कारवाईपासून दूरच

ही कारवाई करताना कळंगुट पोलिसांना दूरच ठेवण्यात आले होते. कळंगुट पोलिस ठाण्याशी संलग्न असलेले कर्मचारी या छाप्यामध्ये सहभागी झाले नव्हते. कारण या गैरप्रकारांना पोलिसांचाच वरदहस्त असल्याचे बोलले जात होते. कळंगुट पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६० हून अधिक कर्मचारी साध्या वेशात तैनात करण्यात आले होते.

व्यूहरचना अशी...

  • ही कारवाई प्रामुख्याने कळंगुट, बागा, कांदोळी, हणजुणे परिसरात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • या परिसरातील दलाल कळंगुट पोलिसांना ओळखतात. अनेकांचे खात्याशी ‘अर्थ’पूर्ण संबंध आहेत.

  • त्यामुळे उत्तर गोेवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी या परिसरात कधीही न आलेल्या डिचोली, वाळपई, कोलवाळ या पोलिस स्थानकातील पोलिसांचे पथक तयार केले.

  • त्यांना ठिकठिकाणचे पॉईंट देण्यात आले. हे करताना पोलिसांनी पर्यटक वापरतात, त्या पद्धतीच्या बर्मुडा आणि टी-शर्ट असा वेश परिधान केला होता.

  • हे पर्यटकरूपी पोलिस किनारी भागात शुक्रवारपासून फिरत होते. अनेकांनी कथित डान्स बार, वेश्‍या व्यवसाय यांची माहिती मिळवली होती.

  • संध्याकाळी हे दलाल पोलिसांच्याच मागे लागले आणि संबंधित ठिकाणे तसेच इतर माहिती देऊ लागले. त्यानंतर या पोलिसांनी अतिरिक्त फोर्सला माहिती देत एक एक करत २८ जणांना ताब्यात घेतले.

  • या कारवाईचा सुगावा बागा आणि हणजुणे येथील काही दलालांना लागला. त्यामुळे ते लागलीच भूमिगत झाले.

Goa police arrest 28 touts
Goa Police: एफआयआर नोंद दिरंगाई प्रकरणी वाळपई पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते निलंबित

यापुढेही मोहीम सुरूच राहणार

पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेला वेश्‍या व्यवसाय, दलाली, रेस्टॉरंट आणि हॉटेलमधील पर्यटकांची लूट यापुढे होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. पोलिस आणि पर्यटन खाते यापुढेही अशीच कारवाई करत राहील, असे पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले. या कारवाईमुळे पर्यटकांमधून समाधान व्यक्त केले जात असून पर्यटन खात्यानेही या कारवाईचे स्वागत केले आहे.

प्रत्येकी 50 हजार दंड

पोलिसांनी या 28 दलालांना गोवा पर्यटन व्यापार कायद्यान्वये अटक करून पुढील कारवाईसाठी पर्यटन संचालनालयासमोर हजर केले. याप्रकरणी प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावला असल्याची माहिती मिळाली. यापुढेही ही कारवाई सुरूच राहील, असे अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले.

"यापूर्वी हैदराबाद पोलिसांनी गोव्यातील ड्रग्स डीलरना अटक केली होती. आता केंद्रीय पथकाने ड्रग्स तस्करांना पकडले. यावरून गोवा पोलिसांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. एक तर गोवा पोलिस अकार्यक्षम आहेत किंवा ते दुर्लक्ष करत आहेत. मुख्यमंत्र्यांना ड्रग्स व्यवहार बंद करण्याची इच्छाशक्ती नाही."

दुर्गादास कामत, सरचिटणीस, गोवा फॉरवर्ड.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com