Panaji Hit And Run Case: पादचाऱ्याला ठोकरणारा नौदल कर्मचारी अखेर जेरबंद

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, दाबोळीत पकडले
Accused arrested in Panaji Hit And Run Case
Accused arrested in Panaji Hit And Run CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Hit And Run Case: मेरशी सर्कल येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास रस्त्याने चालत जाणाऱ्या मनोज शशीधरन (३९) यांना ठोकर देऊन पसार झालेल्या कारचालक नागनेश नूकाराजू बंदी (32) याला जुने गोवे पोलिसांनी वर्णापुरी - दाबोळी येथून शिताफीने अटक केली.

अपघातग्रस्त कारही जप्त करण्यात आली आहे. संशयित नागनेश हा नौदल कर्मचारी आहे. या अपघातातील मनोज यांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती जुने गोवे पोलिस निरीक्षकांनी दिली.

Accused arrested in Panaji Hit And Run Case
MLA Disqualification Petition : आमदार अपात्रताप्रकरणी पाटकर उच्च न्यायालयात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरशी येथे राहत असलेला मनोज शशीधरन रात्री 3 च्या सुमारास मेरशी सर्कल येथील रस्त्याच्या बाजूने चालत जात होता. यावेळी पणजीहून बांबोळीकडे जाणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. या धडकेनंतर कारचालक गाडी घेऊन पसार झाला होता.

मेरशी सर्कल येथील वाहतूक सिग्नल यंत्रणा काही दिवसांपूर्वी वाहतूक कोंडीमुळे बंद ठेवण्यात आली होती. या कारचा शोध घेण्यासाठी पाच पोलिस पथके स्थापन करण्यात आली.

या सर्व पथकांना फोंडा, पणजी, मडगाव व वास्को अशा विविध ठिकाणी रस्त्याच्या बाजूने असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे माहिती मिळवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

अपघातग्रस्त कारची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, रात्रीची वेळ असल्याने कारचा क्रमांक अस्पष्ट दिसत होता. त्यामुळे कारचालकाचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेरा तसेच मोबाईल लोकेशनच्या साहाय्याने शोध सुरू केला आणि संशयित नागनेश याला ताब्यात घेतले.

Accused arrested in Panaji Hit And Run Case
CM Pramod Sawant : राज्यातील वाघ वाढीसाठी प्रयत्न करणार

घातपाताचा संशय फेटाळला

मयत नागेश शशीधरन हा मूळचा केरळ येथील असून तो सांताक्रुझ येथे सध्या राहतो. त्याचा हाऊसकिपिंगचा व्यवसाय होता. गेल्या काही महिन्यांपासून तो कुटुंबातील काही कारणांमुळे तणावाखाली होता.

त्याला रात्रीच्या झोपेबाबत समस्या होती. त्यामुळे कधीही रात्रीचा उठून रस्त्यावरून चालण्याची सवय होती. त्या रात्री तो चालण्यासाठी गेला व ही दुर्घटना घडली अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे हा घातपाताचा संशय फेटाळून लावण्यात आला आहे, अशी माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली.

संशयित नौदल कर्मचारी

मूळचा आंध्रप्रदेश येथील संशयित नागनेश बंदी हा नौदल कर्मचारी आहे. तो वर्णापुरी - दाबोळी येथील दलाच्या निवासी संकुलात राहतो. शक्रवारी रात्री तो पर्वरीतील कसिनोमध्ये जुगारासाठी गेला होता.

रात्री तीनच्या सुमारास तो कार घेऊन दाबोळी येथे परतत असताना भरधाव असलेल्या त्याच्या कारची धडक मनोज यांना बसली व ते गंभीर जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com