CM Pramod Sawant on Status Of Tiger 2023 : राज्यातील वाघांची संख्या कमी झाल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्टेटस ऑफ टायगर 2023 या अहवालातून स्पष्ट झाली आहे.
याबाबत आपणाला खंत आणि दुःख आहे. राज्यात वाघांची संख्या वाढावी, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू राहतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.
केंद्र सरकारच्या वाईल्ड इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि देशभरातील तज्ज्ञ वन्यजीव अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला ‘स्टेटस ऑफ टायगर 2022’ अहवाल पंतप्रधानांच्या हस्ते जाहीर झाला आहे. यात पश्चिम घाटातील वाघांची संख्या कमी झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
यानूसार गोव्यातील वाघांची संख्या ही कमी झाली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, काही घटनांमुळे वाघांची संख्या कमी झाली आहे. 2009 ते 2019 पर्यंत राज्यात 5 वाघांची हत्या करण्यात आली. या घटनेचे दुःख आणि खंत आहे.
यापुढे वाघांची संख्या वाढावी, यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न केले जातील. केंद्र सरकारने जाहीर केलेला अहवाल आपण मागवला असून या अहवालाच्या आपण अभ्यास करणार असून अभ्यास अंती यावर काही निर्णय घेण्यात येतील.
व्याघ्र संवर्धनासाठी घेणार केंद्र सरकारची मदत : विश्वजीत राणे
केंद्र सरकारच्या व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अखत्यारीत देशभर राबवलेल्या व्याघ्रगणतीसाठी तब्बल 32,588 ट्रॅप कॅमेरे वापरण्यात आले होते.
या कॅमेऱ्याच्या साह्याने तब्बल 4 कोटी 70 लाख फोटो घेण्यात आले. याशिवाय अन्य ठिकाणाहून 97 हजार 399 फोटोग्राफ्स काढण्यात आले. या कॅमेऱ्यात तब्बल 3 हजार 80 वाघांची नोंद आहे.
राज्यातील वाघसंख्या वाढीसाठी पूरक वातावरण तयार करण्याकरिता वाघांचे खाद्य आणि त्यांची जैवविविधतेची साखळी सांभाळणे गरजेचे आहे. याकरिताच वन्य अभ्यासक लुथ्रा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकारची ही मदत घेतली जाईल .
विश्वजीत राणे, वनमंत्री
2022 मधील वाघांची संख्या 3,167
जगातील 70 % वाघ देशात
2006 -1411
2010-1706
2014 -2226
2018-2967
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.