IND W vs NZ W: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय ओपनर्सचा डबल धमाका! स्मृती मानधना-प्रतिका रावलने ठोकले शतक, रचला नवा इतिहास! VIDEO

Smriti Mandhana & Pratika Rawal Record: आता तिसऱ्यांदा हा पराक्रम स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या भारतीय सलामीच्या फलंदाजांनी करुन दाखवला.
Smriti Mandhana & Pratika Rawal Record
Smriti Mandhana & Pratika RawalDainik Gomantak
Published on
Updated on

Smriti Mandhana & Pratika Rawal Make History: सध्या महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये टीम इंडिया चमकदार कामगिरी करत आहे. स्पर्धेची सुरुवात चांगली झाल्यानंतर काही सामन्यांत टीम इंडियाला (Team India) पराभवाचा सामना करावा लागला, पण आता संघ पुन्हा एकदा आपल्या लौकिकात परतताना दिसत आहे. अशाच एका महत्त्वाच्या सामन्यात भारताच्या दोन सलामीच्या फलंदाजांनी एक मोठा रेकॉर्ड केला, जो महिला वनडे विश्वचषकाच्या (Women's ODI World Cup) इतिहासात यापूर्वी केवळ दोनच वेळा झाला होता.

आता तिसऱ्यांदा हा पराक्रम स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि प्रतिका रावल (Pratika Rawal) या भारतीय सलामीच्या फलंदाजांनी करुन दाखवला.

दोन्ही सलामीच्या फलंदाजांचे शतक

न्यूझीलंडविरुद्धच्या महिला वनडे विश्वचषकाच्या महत्त्वाच्या सामन्यात स्मृती मानधना आणि प्रतिका रावल सलामी देण्यासाठी मैदानात उतरल्या. सुरुवातीला सावध खेळी खेळत खेळपट्टीचा अंदाज येताच दोघींनीही धावांचा वेग वाढवला. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी अत्यंत जबरदस्त फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरशः विकेटसाठी तळमळायला लावले. पहिल्यांदा स्मृती मानधनाने आपले शतक पूर्ण केले आणि त्यानंतर प्रतिका रावलनेही शतकी खेळी साकारली. महिला वनडे विश्वचषकाच्या इतिहासात ही फक्त तिसरीच वेळ आहे, जेव्हा एकाच संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी शतक ठोकले आहे.

37 वर्षांनंतर विक्रम झाला ताजा

  • पहिली वेळ (1973): महिला विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात प्रथम 1973 मध्ये इंग्लंडच्या लिन थॉमस आणि एनिड बेकवेल यांनी सलामीच्या जोडीदार म्हणून शतक झळकावले होते.

  • दुसरी वेळ (1988): त्यानंतर, 1988 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या लिंडसे रीलर आणि रुथ बकस्टीन यांनी सलामीला येत शतकी भागीदारी केली होती.

  • तिसरी वेळ (2025): तब्बल 37 वर्षांनंतर हा विश्वविक्रम स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी पुन्हा जिवंत केला.

मानधनाचे 17 वे आंतरराष्ट्रीय शतक

स्मृती मानधनाने केवळ 95 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावांची मौल्यवान खेळी खेळली. हे स्मृतीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 17 वे शतक आहे. भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती खूप पुढे आहे. तिच्यानंतर हरमनप्रीत कौर (8 शतके) आणि माजी कर्णधार मिताली राज (8 शतके) यांचा क्रमांक लागतो. तर प्रतिका रावलने 134 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 122 धावांची शानदार खेळी खेळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com