गोवा पंचायत निवडणुकीत ओबीसींना मिळणार आरक्षण

राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींना या निवडणुकांमध्ये आरक्षण देण्याचे तत्वतः मान्य केले आहे.
OBC Reservation
OBC ReservationDainik Gomantak

पणजी: राज्यात गाजत असलेल्या पंचायत निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार की नाही? याबाबत अनेक प्रश्‍न असताना राज्य सरकारने सादर केलेला इतर मागासवर्गीयांचा (ओबीसी) डाटा ग्राह्य म्हणून राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींना या निवडणुकांमध्ये आरक्षण देण्याचे तत्वतः मान्य केले आहे. त्या संबंधाची अधिसूचना उद्या निघू शकते. या ओबीसी आरक्षणासाठी 19 पोटजातींची अधिसूचना आज पंचायत संचालनालयांने काढली. पंचायत निवडणुकांची घोषणा 17 किंवा 18 जुलै रोजी होईल अशी माहिती निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून मिळाली आहे.

(OBCs will get reservation in Panchayat elections in Goa)

OBC Reservation
मुरगावातील प्रकल्‍पांचा फायदा स्‍थानिकांपेक्षा परप्रांतीयांनाच!

गोवा खंडपीठाच्या निर्णयानंतर अगोदरच निवडणूक आयोगाने 10 ऑगस्ट रोजी मतदान तर 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी असा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आता या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार का? हा प्रश्‍न महत्त्वाचा होता, यासाठी ओबीसी आयोग आणि राज्य सरकारने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या ओबीसी डाटा ग्राह्य मानून निवडणूक आयोगाने ओबीसींना आरक्षण देणे मान्य केले आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये 339 प्रभाग ओबीसींसाठी आरक्षण आरक्षित केले होते. यावेळी इतकेच प्रभाग ओबीसींसाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातली अधिसूचना निवडणूक आयोगाच्या मार्फत लवकरच निघणार आहे यापूर्वी निवडणूक आयोगाने एससी, एसटी आणि महिला आरक्षण प्रभागाची घोषणा केली आहे.

आरक्षण अधिसूचना जाहीर

राज्याच्या पंचायत संचालनालयाने समाज कल्याण आणि ओबीसी आयोगाच्या सहकाऱ्यांनी ओबीसींच्या शैक्षणिक आणि नोकरभरती आरक्षणाप्रमाणे निवडणूक आरक्षण आरक्षणाची अधिसूचना आज जाहीर केली. यामध्ये ओबीसी मध्ये येणाऱ्या 19 पोटजातींची ही घोषणा केली आहे. यात भंडारी, खारवी, तेली, शिंपी, कुंभार, ख्रिस्ती महार, कलयकार, पागी, ख्रिस्ती न्हावी, सतरकार, धोबी, नाभिक, नाथजोगी, गोसावी, धनगर, च्यारी, ठक्कर, कोमरपंत, रेंदेर यांचा समावेश आहे.

या आठवड्यात कार्यक्रम जाहीर

186 पंचायतींचे मतदान 10 तर मतमोजणी 12 ऑगस्टला होणार आहे. या संबंधीचा सविस्तर कार्यक्रम निवडणूक आयोगाला या आठवड्यातच जाहीर करावा लागेल. निवडणुकीसाठी 28 दिवसांची गरज असून 7 दिवस अर्ज भरणे, 1 दिवस छाननी व 1 दिवस माघार घेण्यासाठी दिला जातो. 12 दिवस प्रचार आणि बॅलेट पेपरची छपाई यासाठी लागतात. त्यानंतर मतदानापूर्वी आणि मतदानानंतर 1-1 दिवस राखीव ठेवणे अपेक्षित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com