Kadamba Bus Stand: होंडा कदंब बसस्थानकाचा 'निकृष्ट' कारभार! कोट्यवधी खर्चूनही दुरवस्था, छप्पर गळके अन् लाद्याही फुटल्या; प्रवाशांचे हाल

Kadamba Bus Stand Condition: कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या होंडा येथील कदंब बसस्थानकाची दिवसेंदिवस दयनीय अवस्था होऊ लागलेली आहे.
Kadamba Bus Stand
Kadamba Bus StandDainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या होंडा येथील कदंब बसस्थानकाची दिवसेंदिवस दयनीय अवस्था होऊ लागलेली आहे. याचा मोठ्या फटका या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना होऊ लागलेला आहे.

या बसस्थानकाला चांगले दिवस यायचे असेल तर या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच आवश्यक दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा बसस्थानकावर नागरिकांची वर्दळ पूर्णपणे बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकवेळा मागणी करूनही कदंब महामंडळाने याकडे अजून लक्ष दिलेले नाही, अशी स्थानिक तसेच प्रवाशांची तक्रार आहे.

Kadamba Bus Stand
Goa Politics: मुख्‍यमंत्री, लोबोंसमोर शहांनीच मांडली गोव्‍याची 'राजकीय कुंडली'; कोण बरे बोलतो? कोण जळतो? रिपोर्ट आधीच तयार

काही वर्षांपूर्वी या बस स्थानकाची उभारणी करण्यात आली. मात्र प्रमुख बाजारपेठेपासून दूर असल्याने या बसस्थानकाचा वापर आवश्‍यक प्रमाणात होत नव्हता. मात्र हळूहळू या बसस्थानकाला चांगले दिवस येऊ लागले. या बस स्थानकाचा ताबा कदंब महामंडळाकडे आहे. मात्र महामंडळाने या बसस्थानकाच्या देखरेखीकडे विशेष लक्ष दिले नाही, त्यामुळे या बस स्थानकाची रया गेली व दुरवस्था सुरू झाली.

सध्या छपराला गळती लागली असून काही पत्र उडाले आहेत. याचा फटका या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना बसत आहे.बसस्थानकावर होणाऱ्या गळतीमुळे प्रवासी येथे येथे टाळतात. तसेच खासगी बसेस येथे थांबा घेत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते.

व्यावसायिक नाराज

काही व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार दर महिन्याला कदंब महामंडळाला भाडे भरण्यात येते, मात्र येथील समस्या सोडविण्याकडे महामंडळाचे लक्ष नाही. छपरातून गळती होते, त्यामुळे व्यवसाय करणे कठीण बनलेले आहे. यासंदर्भात कदंब महामंडळाला अनेक निवेदने दिली, मात्र काडीचीही दखल घेतली जात नाही. कदंब महामंडळाचे चेअरमननी एकदा तरी या बस स्थानकाला भेट द्यावी व येथील परिस्थितीची जाणीव करून घ्यावी अशी मागणी नागरिक व व्यावसायिकांनी केलेली आहे.

Kadamba Bus Stand
Goa Politics: बाबू आजगावकरांचा मुलगाच डिस्कोत विकतो गांजा! आमदार आर्लेकरांचे प्रतिउत्तर, म्हणाले, मी पुन्हा येईन...

सभागृह होणार का?

या बस स्थानकावर चांगल्या दर्जाचे सभागृह उपलब्ध करून देण्याबाबत आमदार डॉ. दिव्या राणे यांनी भाष्य केले होते. त्यामुळे येथील व्यावसायिक व नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, परंतु अजून काही हालचाल नसल्याने लोकांत चलबिचल सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com