Stray Cattle: मडगावात भटक्या गुरांमुळे अपघातात वाढ

गुरांचा पालिकेने त्‍वरित बंदोबस्त करावा तसेच त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Stray Cattle In Margao
Stray Cattle In MargaoDainik Gomantak

मडगाव शहरात भटक्‍या गुरांचा सुळसुळाट झाला असून ती मुख्य रहदारीच्या ठिकाणी फिरत असतात. त्‍यामुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे. अपघातांची संख्‍याही वाढली आहे. या गुरांचा पालिकेने त्‍वरित बंदोबस्त करावा तसेच त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Stray Cattle In Margao
Goa Food Court: कुडचडेतील फूडकोर्टचा प्रश्‍‍न मार्गी!

शहरातील अनेक मार्गांवर, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. रस्त्यावरील मुख्य ठिकाणी तसेच दुभाजकामध्ये त्यांचा ठिय्या असतो.

अशीच स्थिती मुख्य बाजारपेठ, आके पॉवर हाऊस जंक्‍शन, कोलवा सर्कल, रावणफोंड जंक्‍शन व अन्‍य ठिकाणी असते. त्‍यामुळे भविष्‍यात मोठा अपघात होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबत बोलताना कुडतरी येथील जुझे कॉस्ता यांनी सांगितले की, आपण पणजीत कामाला जातो.

Stray Cattle In Margao
‘कुर्डी अर्बन’ची नाहक बदनामी करणाऱ्याविरुद्ध तक्रार करणार!...

रात्री यायला उशीर होतो. कदंब बसस्थानकापासून कुडतरी येथे घराच्या ठिकाणी जाण्याच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्‍त्‍याच्या मधोमध ही गुरे ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहन चालविताना काळजी घ्यावी लागते.

तर, शिरवडे-नावेली येथील दीपक नाईक यांनी सांगितले की, भटक्‍या गुरांमुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्‍वारांना धोका निर्माण झाला आहे. या गुरांचा त्‍वरित बंदोबस्‍त करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com