Goa Deendayal Scheme: गोवा सरकारचा मोठा निर्णय! दीनदयाळ योजनेत आता दरमहा 500 रुपये जास्त; मोटारसायकल पायलट, तृतीयपंथीयांनाही लाभ

Goa Government Scheme: दीनदयाळ सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत (डीडीएसएसवाय) विविध गटांतील लाभार्थींना मिळणाऱ्या मासिक अर्थसहाय्‍यात सरकारने प्रत्‍येकी ५०० रुपयांची वाढ केली आहे.
Goa Government Scheme
Goa Deendayal SchemeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: दीनदयाळ सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत (डीडीएसएसवाय) विविध गटांतील लाभार्थींना मिळणाऱ्या मासिक अर्थसहाय्‍यात सरकारने प्रत्‍येकी ५०० रुपयांची वाढ केली आहे. सोबतच, मोटारसायकल पायलट आणि तृतीयपंथीयांनाही योजनेच्या कक्षेत आणले आहे. समाजकल्‍याण खात्‍याचे संचालक दीपक देसाई यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

योजनेअंतर्गत राज्‍यातील ज्येष्ठ नागरिक, एकट्या राहणाऱ्या महिला, दिव्यांग प्रौढ आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले लाभार्थी यांना प्रत्‍येक महिन्‍याला दोन हजार रुपये मिळत होते. यापुढे त्‍यांना २५०० रुपये मिळतील. ९० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या मुलांसाठीची साहाय्य रक्कम २५०० वरून ३ हजार, ९० टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींचे साहाय्‍य ३५०० वरून ४ हजार रुपये करण्‍यात आले आहे.

Goa Government Scheme
Goa Smart Meter: '15 दिवसांत स्मार्ट मीटरचा निर्णय मागे घ्या', अमित पाटकरांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

ज्या विधवा महिलांचे सर्वांत लहान अपत्य २१ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहे, त्यांना पूर्वी प्रत्‍येक महिन्‍याला ४ हजार रुपयांचे साहाय्‍य मिळत होते. यापुढे त्‍यांना महिन्‍याला ४५०० रुपये दिले जातील. तर, ज्या विधवा महिलांना अपत्ये नाहीत, ज्यांचे सर्वांत लहान अपत्य २१ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहे आणि ज्या विधवा महिलांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना यापुढे योजनेअंतर्गत ३ हजार रुपये मिळतील, असे नमूद करण्‍यात आले आहे.

पायलटांना ‘गृहआधार’चा अडथळा नाही

राज्‍य सरकारने मोटारसायकल पायलटांनाही योजनेचा लाभ देण्‍याचे निश्‍चित केले आहे. ५० ते ६० वर्षे वयोगटातील पायलटांना प्रत्‍येक महिन्‍याला २ हजार, तर ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पायलटांना २५०० रुपये देण्‍यात येणार आहेत. या पायलटांच्‍या पत्नी ‘गृहआधार’ योजनेचा लाभ घेत असल्या तरीही ते योजनेसाठी पात्र असतील. मात्र अन्‍य अटी त्‍यांना पूर्ण कराव्‍या लागतील.

Goa Government Scheme
Girls Safety In Goa: सुरक्षित गोव्याची ओळख धोक्यात

तृतीयपंथीयांसाठी अट

सुधारित योजनेअंतर्गत तृतीयपंथी व्यक्तींना महिन्‍याला २५०० रुपयांचे अर्थसाहाय्‍य मिळेल. परंतु, यासाठी अर्ज करणाऱ्यांकडे गोव्यात किमान दहा वर्षे वास्‍तव्‍यास असल्‍याचा पुरावा आणि सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले तृतीयपंथी प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र असणे आवश्यक आहे, असे अधिसूचनेत म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.