‘डेसिबल मीटर’ शिवाय हणजूण पोलिस; रेव्हपार्ट्यांचे सत्र सुरूच

किनाऱ्यांवर रेव्हपार्ट्यांचे वाढतेय ध्वनिप्रदूषण, मात्र ध्वनिप्रदूषण (Noise pollution) मोजण्याचे उपकरणच या पोलिस स्थानकात नाही,
Decibel meter
Decibel meterDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हणजूण पोलिसांकडून (Anjuna Police) ध्वनिप्रदूषणसंदर्भातच्या तक्रारींची दखल घेतली जात असली तरी गेल्या दोन वर्षांपासून त्यांना नवा`डेसिबल मीटर’ (Decibel meter) पुरविण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांना वारंवार स्मरणपत्र पाठवण्यात आले तरी त्याची दखल अजूनही घेतलेली नाही. त्यामुळे ध्वनिप्रदूषण (Noise pollution) मोजण्याचे उपकरणच या पोलिस स्थानकात नाही, अशी माहिती हणजूण पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उघड झाली नाही.

निरीक्षक सूरज गावस यांनी ज्या तक्रारी येतात त्यासंदर्भात त्वरित कारवाई करून म्युझिकचे सामान जप्त करण्यात येत आहे. याचिकादाराकडून जेव्हा तक्रार आली आहे तेव्हा त्वरित कारवाई केली गेली आहे. 2019 साली नादुरुस्त झालेला ‘डेसिबल मीटर’ अजूनही पोलिस खात्याकडून मिळालेला नाही.

Decibel meter
Goa Police: गृहरक्षक रवळू गांवस यांचा हणजुण पोलीसातर्फे जाहीर सत्कार

याचिकादार सागरदीप शिरसईकर यांनी सरकारसह उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात रात्री उशिरापर्यंत रेव्ह पार्ट्या सुरू ठेवण्यात आल्याने ध्वनिप्रदूषण होत असल्याची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर आज सुनावणीस आली. सरकारी यंत्रणा असूनही या पार्ट्या पहाटेपर्यंतही सुरू असूनही ध्ननिप्रदूषण देखरेख समितीचे नियंत्रण नसल्याचे याचिकादाराच्या वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी, म्हापसा उपजिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक, म्हापसा पोलिस उपअधीक्षक, हणजूण पोलिस निरीक्षक, पर्यटन खाते, हणजूण पंचायत व अबकारी आयुक्त व लार्वे बीच शॅकचे प्रोप्रा. परेरा यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. रात्री उशिरा रेव्हपार्ट्या सुरू ठेवून परवान्यांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवानेच रद्द करण्यात यावेत, अशी विनंती याचिकादाराने केली आहे.

Decibel meter
Goa: कुठ्ठाळीचा विकास करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी

या जनहित याचिकेत उत्तर गोवा जिल्हाधिकारी (North Goa Police) तसेच हणजूण पोलिसांनी प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. याचिकेत हणजूण परिसरामध्ये हे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचा दावा याचिकादाराने केला आहे. या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून डेस्मंड फर्नांडिस व फ्लोरिनो लोबो यांची नेमणूक करण्यात आली होती, मात्र त्यांच्या बदली आता देवानंद शिरोडकर व डोमिंगोस परेरा यांची नेमणूक केली आहे. ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ७ ध्वनी देखरेख उपकरणे खरेदी करण्यात आली असून उत्तर गोव्यातील विभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केली आहे.

निरीक्षक सूरज गावस यांनी पोलिसांत ज्या तक्रारी येतात त्यासंदर्भात त्वरित कारवाई करून म्युझिकचे सामान जप्त करण्यात येत आहे. याचिकादाराकडून जेव्हा तक्रार आली आहे तेव्हा त्वरित कारवाई केली गेली आहे त्यामुळे कारवाईत कसर झाल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com