Goa Police: गृहरक्षक रवळू गांवस यांचा हणजुण पोलीसातर्फे जाहीर सत्कार

रवळू गांवस यांना यंदाचा राष्टपती पुरस्कार (Presidential Award) प्राप्त (Goa Police)
Home Guard Ravalu Gawas felicitated by Anjuna Police (Goa Police)
Home Guard Ravalu Gawas felicitated by Anjuna Police (Goa Police)Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police: आपल्या वाट्याला आलेले कुठलेही काम जो कुणी निस्वार्थ भावनेने तसेच निष्ठेने करतो. अशाच लोकांची दखल समाज आणि सरकार घेत असतो, सामान्यातल्या सामान्य व्यक्तीच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करणे हेच आपल्या भारतीय संविधान आणि संस्कृतीचे वैशिष्ट्य असल्याचे मत हणजुणचे पोलीस निरीक्षक सुरज गांवस यांनी हणजुणात केले. बार्देशातील हणजुण पोलिस स्थानकाशी संबंधीत गृहरक्षक रवळू दत्ताराम गांवस (Home Guard Ravalu Gawas) यांना यंदाचा राष्टपती पुरस्कार (Presidential Award) प्राप्त झाल्याच्या पाश्वभुमीवर हणजुण पोलीसातर्फे त्यांचा मंगळवारी जाहीर सत्कार करण्यात आला (felicitated by Anjuna Police).

Home Guard Ravalu Gawas felicitated by Anjuna Police (Goa Police)
1200 विदेशी पर्यटकांची गोव्यात भटकंती

यावेळी पोलिस निरीक्षक सुरज गांवस, उप-निरीक्षक अमीर तरल, वाहतुक विभागाचे वामन नाईक, हेडकॉन्सटेबल मोहन परब तसेच इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते. सामान्य वृत्ती आणि पापभिरू स्वभावाच्या रवळू गांवस यांनी साल 1986 साली गृहरक्षक दलात प्रवेश केला होता. गोव्याच्या राजधानीचे शहर असलेल्या पणजीसह म्हापसा, तसेच इतर महत्वाच्या पोलीस स्थांनकात काम केले आहे. दरम्यान, याआधी साल 2012 मध्ये मुख्यमंत्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. दरम्यान, सेवानिवृत्त झालेल्या रवळू गांवस यांचे हणजुण पोलिस स्थानकात स्वखुशीने सेवाकार्य चालुंच असते अशी माहिती निरीक्षक सुरज गांवस यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com