Hospital Power Failure: म्हापशातील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात अंधार; तब्बल 4 तास वीज गायब, रुग्ण-डॉक्टरांचे प्रचंड हाल!

Goa Hospital Power Outage: येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात आज एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला.
Goa Hospital Power Outage
Goa Hospital Power OutageDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात आज एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला. रुग्णालयातील मुख्य वीजपुरवठा अचानकपणे तब्बल चार तास खंडित झाल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ, भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी (ता. १ जून) सायंकाळी अंदाजे ४ वाजल्यापासून रुग्णालयाची वीज अचानक गायब झाली आणि पुढील सुमारे चार तास हा अंधार कायम होता.

Goa Hospital Power Outage
वीज वितरणात गोव्याची उत्तुंग झेप! देशात 11वे स्थान; ‘डिस्ट्रिब्युशन युटिलिटीज रँकिंग’मध्‍ये तिसरा क्रमांक

सर्वात गंभीर बाब म्हणजे, रुग्णांचे प्राण वाचवणारी अत्यंत आवश्यक वैद्यकीय उपकरणे देखील या खंडित वीज पुरवठ्यामुळे प्रभावित झाली होती. रुग्णालयाकडे योग्य आणि सक्षम पर्यायी वीज व्यवस्था (बॅकअप) उपलब्ध नसल्यामुळे भर उकाड्यात रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रचंड हाल सोसावे लागले.

एकीकडे हवालदिल झालेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या कोंदट वातावरणात आणि अंधारात मदतीची वाट पाहात होते, तर दुसरीकडे प्रामाणिकपणे सेवा देणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरेशा विजेअभावी रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि सेवा व्यवस्थापित करण्यासाठी कमालीचा संघर्ष करावा लागला.

Goa Hospital Power Outage
Goa Electricity: गरजेएवढी वीज वापरता येणार; 'स्मार्ट मीटर'बाबत अपप्रचाराला बळी पडू नका, ढवळीकरांचं आवाहन

जिल्हा पातळीवरील मुख्य रुग्णालयात अशा संवेदनशील तांत्रिक यंत्रणेचा बिघाड होणे, पर्यायी बॅकअप व्यवस्था अपयशी ठरणे आणि तासनतास आरोग्य सेवा ठप्प होणे, यावरून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर आता जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भविष्यात अशा गंभीर घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

‘एएमएफ’ पॅनेलमध्ये बिघाड

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील ‘एएमएफ’ पॅनेलमध्ये अचानक मोठा बिघाड झाला. यामुळे संपूर्ण रुग्णालयाचा वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाला.

या तांत्रिक बिघाडामुळे रुग्णालयातील लिफ्ट पूर्णपणे बंद पडल्या, अनेक महत्त्वाच्या विभागांमधील दिवे मालवले आणि पंखे तसेच वातानुकूलित यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली.

Goa Hospital Power Outage
Electricity Department: काठी फेकून खंडित केला वीजपुरवठा! हणखणेतील धक्कादायक प्रकारामुळे नागरिक, व्यावसायिक हैराण

सरकारच्या अपयशाचे द्योतक

म्हापसा जिल्हा रुग्णालयात आज सायंकाळी वीजपुरवठा खंडित राहिल्याने रुग्णालयातील लिफ्ट, प्रकाश व्यवस्था तसेच काही अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांच्या कार्यावर परिणाम झाला. परिणामी रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. ही घटना राज्यातील भाजप सरकार आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या प्रशासनिक अपयशाचे द्योतक असल्याची टीका काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

पणजीकर यांनी म्हटले की, उत्तर गोव्यातील प्रमुख शासकीय आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या म्हापसा जिल्हा रुग्णालयात इतक्या दीर्घ कालावधीसाठी वीजपुरवठा खंडित होणे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. आरोग्य सेवांमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय हा थेट रुग्णांच्या सुरक्षिततेशी संबंधित असतो. अशा परिस्थितीत अखंडित वीजपुरवठा आणि प्रभावी आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध असणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी आहे.

Goa Hospital Power Outage
Electricity Department: काठी फेकून खंडित केला वीजपुरवठा! हणखणेतील धक्कादायक प्रकारामुळे नागरिक, व्यावसायिक हैराण

राज्यातील महत्त्वाच्या आरोग्य संस्थांना अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. रुग्णालयांसारख्या संवेदनशील संस्थांमध्ये वीज खंडित होणे ही अत्यंत गंभीर बाब असून याबाबत वीजमंत्री ढवळीकर यांनी जनतेसमोर स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे पणजीकर म्हणाले.

चार वाजता गेलेली वीज ९ वाजता पूर्ववत

या घटनेची माहिती मिळताच वीज विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व अभियंते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी युद्धपातळीवर काम करत तांत्रिक बिघाड दुरुस्त केला आणि अखेर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात अखेर यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com