

पणजी: गोव्याने वीज वितरण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये अकरावे स्थान पटकावले आहे. तर, केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने जाहीर केलेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ‘डिस्ट्रिब्युशन युटिलिटीज रँकिंग’ अहवालात गोव्याने आपल्या गटात तिसरा क्रमांक मिळवला आहे.
दिल्ली येथे आयोजित ऊर्जामंत्र्यांच्या परिषदेत ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. गोव्याच्या वीज खात्याला एकूण ७८.५ गुण मिळाले. शहरी व विशेष राज्यांचा अपवाद वगळता ४१ समकक्ष वीज वितरण कंपन्यांमध्ये गोवा तिसऱ्या स्थानावर राहिला.
या गटात गोवा, गुजरातमधील दक्षिण गुजरात वीज कंपनी आणि ओडिशातील टीपी नॉर्थन ओडिशा डिस्ट्रीब्युशन यांच्या मागे राहिला. तरीही विविध निकषांवर सातत्यपूर्ण आणि भक्कम कामगिरी करत गोव्याने आपली क्षमता सिद्ध केल. या मूल्यांकनात आर्थिक व कार्यकारी कार्यक्षमता, ग्राहक सेवा, नवीकरणीय ऊर्जा खरेदी बंधन, स्मार्ट मीटरिंग, मागणी व्यवस्थापन आणि संसाधन उपलब्धता या सहा प्रमुख निकषांचा विचार करण्यात आला.
गोव्याने नवीकरणीय ऊर्जा खरेदी बंधन आणि सिस्टीम मीटरिंगमध्ये शंभर टक्के गुण मिळवत विशेष कामगिरी केली. मात्र, मागणी प्रतिसाद घटकात केवळ १९ गुण मिळाले.
- देशात ११वे स्थान
- गटात तिसरा क्रमांक
- एकूण गुण : ७८.५
- ६६ वीज कंपन्यांमध्ये स्पर्धा
- सातत्यपूर्ण, संतुलित कामगिरी
कुठे सुधारणा आवश्यक?
‘डिमांड रिस्पॉन्स’मध्ये कमी गुण (१९)
‘टाईम-ऑफ-डे’ प्रणालीचा मर्यादित वापर
सर्व ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरिंगची गरज
ऊर्जा वापर व्यवस्थापनात अधिक भर आवश्यक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.