Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Noida Businessman Death Goa: फातोर्डा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून या प्रकरणाची तूर्त नोंद केली आहे.
Noida Businessman Death Goa
Goa Hotel DeathDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: व्यावसायिक कामानिमित्त गोव्यात आलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडा येथील ५७ वर्षीय व्यावसायिकाचा फातोर्डा येथील एका हॉटेलमधील खोलीत संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. आशिष विज असे मृताचे नाव आहे.

फातोर्डा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून या प्रकरणाची तूर्त नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रक्षदा नाईक पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ५.१९ वाजण्याच्या सुमारास बीट पोलिस कर्मचाऱ्याकडून सीझन्स हॉटेलमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली.

Noida Businessman Death Goa
British Tourist Dead: कळंगूटमधील हॉटेलमध्ये ब्रिटीश नागरिकाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू

त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक ३०६ मध्ये संबंधित व्यक्ती जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळली. त्याचे डोके टेबलाला टेकलेले होते. चौकशीत मृताची ओळख आशिष विज अशी पटली असून, ते सेक्टर-१२, नोएडा, उत्तर प्रदेश येथील असल्याचे उघड झाले. ते व्यावसायिक कामासाठी गोव्यात आले होते.

१०८ रुग्णवाहिकेच्या वैद्यकीय पथकाने तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला. न्यायवैद्यक तज्ज्ञ, ठसेतज्ज्ञ आणि वैज्ञानिक पुरावा पथकाने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक नमुने जप्त केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com