गोव्यात इतर पक्षांसोबत युतीचा प्रश्नच नाही, बहुमत भाजपालाच; फडणवीसांचा दावा

भाजपलाच बहुमत मिळणार असून पक्षाचा विजय निश्चितच आहे; देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
Devendra FadnavisDainik Gomantak

Devendra Fadnavis: संपूर्ण देशभरातील पाच राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. पाचही राज्यांमध्ये अवघ्या काही दिवसांवर निवडणुका (Goa Assembly Elections 2022) पार पडणार आहेत. यामध्ये गोव्यातही 14 फेब्रुवारीला एका टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. आणि यामुळेच सर्वच पक्ष अटी-तटीची लढाई लढण्यास सज्ज झाले आहेत. या मध्यंतरीच्या काळामध्ये गोव्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ माजली होती. गोव्यातील सत्ताधारी पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी गोव्यातील इतर पक्ष जय्यत तयारी करताना दिसत आहेत. या संदर्भात जनतेशी संवाद साधण्यासाठी आज भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी 'गोमंतक'ला भेट देऊन अनेक विषयांवर चर्चा केली. (Devendra Fadnavis Latest News Updates)

Devendra Fadnavis
कांदोळीत दोन शॅकला भीषण आग

जनतेच्या विकासासाठी भाजप पक्ष (BJP) सुरूवातीपासून कार्यरत असून इथून पुढेही जनतेच्या विकासासाठी पक्ष नेहमीच तत्पर असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

'भाजप पक्षाने स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या काळात आणि त्याआधीपासून अनेक विकासकामं राबवली आहेत, जनतेचे प्रश्‍न सोडवले आहेत. भाजप पक्ष कधीही कुठल्याही जाती-धर्मांमध्ये न अडकता, न भेदभाव करता सर्वांना समान न्याय देऊन कार्यरत आहे', असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

विरोधकांवर निशाणा

दरम्यान त्यांनी इतर पक्षांवरही जोरदार टोला लगावला आहे. ते म्हणाले की, 'जे पक्ष मोठमोठ्या घोषणा आणि आश्वासने देत आहेत, त्या घोषणा किंवा ती आश्वासनं त्यांच्या भागांमध्ये म्हणजे बंगाल आणि दिल्लीमध्ये कुठं दिसतात? मग असं असताना या योजना ते गोव्यात कशा प्रकारे राबवणार? आणि जे लोक टीका करतात, ते स्वत:च्या स्वार्थासाठी टीका करतात. कारण निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते कधी तक्रार करत नाहीत. पण जे करतात, ते नक्कीच त्यांच्या स्वार्थासाठी,' असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

गोव्यातील पक्षांतर

एकंदरीत राजकारणात आणि भाजपमध्ये झालेल्या पक्षांतरावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. काही गोष्टींमुळे पक्षातील महत्वाचे नेते पक्ष सोडून गेले. पण तरीही सकारात्मकपणे त्यांनी या गोष्टींवर प्रकाश टाकत, पक्ष जनतेसाठी लढतच राहणार असल्याचे म्हटले आहे. निवडणुका अवघ्या काही तोंडावर असताना आणि पक्षाला महत्त्वाच्या नेत्यांनी पाठ दाखवली असताना भाजपसमोर काही आव्हानं किंवा अडचणी आहेत का ? असा प्रश्न त्यांना केला असता, त्यांनी ठामपणे सांगितलं की, 'आता आव्हानांचा आणि अडचणींचा विचार करायची वेळ नाही. आता फक्त एकच लक्ष, ते म्हणजे 'गोवा विधानसभा निवडणूक'. ही निवडणूक 14 फेब्रुवारीला झाल्यानंतर मग आव्हानांचा विचार करता येईल. पण त्याचबरोबर मी हे सांगू इच्छितो की, कोणतीही आव्हानं किंवा कोणत्याही अडचणींना सामोरं जाण्यासाठी भाजप नेहमीच तयार असणार आहे.', अशा आत्मविश्वासाने त्यांनी भाजप सत्ताधारी पक्ष का आहे, ही सिद्ध केले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: उत्पल पर्रीकर हे चांगले कार्यकर्ते, मात्र...

प्रलंबित खाण व्यवसाय

प्रलंबित खाण व्यवसायावर गोव्यातील अर्थकारण बऱ्याच अंशी अवलंबून आहे. गोव्यातील खाण व्यवसाय गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी एक उत्तम स्त्रोत आहे. पण काही कारणांमुळे सध्या हा बंद असलेला खाण व्यवसाय लवकरच सुरू करण्याची गरज आहे. यासाठी आम्ही 'खनिज महामंडळाची' स्थापना केली आहे. हे जे काही मुद्दे आहेत, ते आम्ही सुप्रीम कोर्टच्या नजरेस आणून देऊ. आणि कोर्टाच्या नियमांप्रमाणेच यावर काम करू. जेणेकरून गोव्यात सामान्यांच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे, तो ऐरणीवरचा मुद्दा नष्ट होईल. यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि सर्व नियमांप्रमाणे आम्ही यावर उपाय काढणार आहोत, असे फडणवीसांनी सांगितले.

भाजप इतर पक्षांशी युती करणार का?

या निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार किंवा जर पक्षाला कमी जागा मिळाल्यास ते इतर पक्षाशी युती करणार का? असे विचारले असता फडणवीसांनी सांगितले की, 'युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण भाजपलाच बहुमत मिळणार असून पक्षाचा विजय निश्चितच आहे.' या आत्मविश्वासामुळे त्यांनी जनतेच्या हृदयामध्ये एक वेगळ्या प्रकारचे बळ निर्माण केला आहे.

दरम्यान त्यांनी गोव्यातील जनता, गोव्यातील संस्कृती, आणि एकंदरीत राज्याबद्दल अत्यंत आदरयुक्त अभिप्राय व्यक्त केला. 'महाराष्ट्रातल्या माणसाला गोव्यात आल्यावर आपल्या घरी आल्यासारखं वाटतं', असे ते म्हणाले. एकंदरीत ही निवडणूक अत्यंत रंजक ठरणार, यात वाद नाही. आता जनतेचा नेमका काय कौल असणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com