Devendra Fadnavis: उत्पल पर्रीकर हे चांगले कार्यकर्ते, मात्र...

ही निवडणूक भाजपच जिंकणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी गोमंतकशी बोलताना व्यक्त केला आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisDainik Gomantak
Published on
Updated on

Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीसाठी सध्या गोव्याच्या राजकारणामध्ये रणकंदन पाहायला मिळत आहे. गोव्यात रोज नवनवीन राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे गोवा प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज गोव्यातील 'गोमंतक' माध्यमाशी संपर्क साधला. यादरम्यान वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी आपले मत आणि निवडणुकीसाठीचा (Goa Assembly Elections 2022) अजेंडा स्पष्ट केला आहे. (Devendra Fadnavis Interaction With Gomantak Media)

Devendra Fadnavis
Goa Assembly Election: साखळीत मुख्यमंत्री सावंत आणि सगलानी आमने-सामने

दरम्यान, निवडणूक अवघ्या काही दिवसांवर असताना आणि उमेदवार याद्या जाहीर होत असूनही अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी भाजप पक्षाला पाठ दाखवली आहे. यामध्ये प्रामुख्याने मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) आणि लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांचे नाव समोर येते. यासंदर्भात भाजप या दोघांनाही पक्षात राखून ठेवण्यासाठी अपयशी ठरले का? असा प्रश्न त्यांना विचारला असता फडणवीस म्हणाले की, 'आता आपण असे म्हणू शकतो की पक्ष दोघांच्या बाबतीत अपयशी ठरला. पण वास्तव असे आहे की, उत्पल पर्रीकर हे मनोहर पर्रीकर यांचे पुत्र असून ते एक तरुण आणि चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी पक्षात राहणं खरतर गरजेचं होतं. यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली होती. पक्षाने त्यांना इतर मतदारसंघासाठी ऑफरही दिली होती; पण उत्पल पर्रीकर यांनी ती ऑफर नाकारली हे सत्य आहे. आत्ताच आणि फक्त पणजी मतदारसंघच हवा असा त्यांचा हट्ट असल्यामुळे यापुढे पक्ष काहीच करू शकला नाही.'

'पक्षामध्ये उत्पल यांच्यासारख्या तरुण व्यक्तिमत्वाची उपस्थिती असणं खूप महत्त्वाचं. पण त्यांच्या या हट्टामुळे आम्ही त्यांच्यासमोर काहीच करू शकलो नाही', असे मत त्यांनी व्यक्त केले.

Devendra Fadnavis
Goa Election:....तर तृणमूल कॉंग्रेसला नक्कीच फायदा झाला असता: लुईझिन फालेरो

माजी मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांबद्दलही ते बोलले. ते म्हणाले की, 'पार्सेकर हे अनेक वर्षांपासून भाजप पक्षामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आजवर अनेक पदे सांभाळली आहेत. त्यांचं पक्ष सोडून जाणं खरंतर खूप दुर्दैवी आहे. त्यांना सुद्धा आम्ही थांबण्याची विनंती केली होती. त्यांनी ही निवडणूक न लढवता पक्षाला पाठिंबा देण्याची गरज होती. शिवाय त्यांना जर कोणती जबाबदारी सांभाळण्याची इच्छा असल्यास, ती जबाबदारीही पक्ष देण्यास तयार होता; पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे आम्हाला पुढे काहीच करता आलं नाही. पण एक गोष्ट अशी की या दोघांनीही पक्षाला पाठिंबा देऊन आता पक्षात थांबणं गरजेचं होतं, हे मात्र नक्की.'

दरम्यान ही निवडणूक भाजपच (BJP) जिंकणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी गोमंतकशी बोलताना व्यक्त केला आहे. त्यांनी विविध विषयांवर आज गोमंतकशी चर्चा केली आहे. गोव्यातील जे प्रलंबित मुद्दे किंवा नागरिकांचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर भाजप सुरुवातीपासूनच कार्यरत असून, इथून पुढेही कार्यरत असणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com